SRH vs LSG Toss : लखनऊचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय, ‘या’ ओपनरची एन्ट्री

Sunrisers Hyderabad vs Lucknow Super Giants Ipl 2024 Toss : लखनऊ सुपर जायंट्स आणि सनरायजर्स हैदराबाद दोन्ही संघांसाठी हा सामना अटीतटीचा आहे.

SRH vs LSG Toss : लखनऊचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय, या ओपनरची एन्ट्री
pat cummins and k l rahul srh vs lsg ipl 2024,
Image Credit source: BCCI/IPL
| Updated on: May 08, 2024 | 7:38 PM

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 57 व्या सामन्यनात सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स आमनेसामने आहेत. केएल राहुल याच्याकडे लखनऊचं नेतृत्व आहे. तर पॅट कमिन्स याच्याकडे सनरायजर्स हैदराबादची धुरा आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी राजीव गांधी स्टेडियममध्ये सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. लखनऊच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन केएल राहुलने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. लखनऊ आणि हैदराबाद दोन्ही संघांसाठी प्लेऑफच्या हिशोबाने फार महत्त्वाचा सामना आहे. त्यामुळे दोन्ही संघातील प्लेईंग ईलेव्हनमध्ये बदल करण्यात आला आहे.

दोन्ही संघात बदल

हैदराबादचा कॅप्टन पॅट कमिन्स याने प्लेईंग ईलेव्हनमध्ये 2 बदल केले आहेत. मयंक अग्रवाल याच्या जागी सनवरी सिंग याचा समावेश करण्यात आला आहे. तर मार्को जान्सेन याच्या जागी व्यासकांतचा समावेश करण्यात आला आहे. व्यासकांतचं हे आयपीएल पदार्पण ठरलंय. तसेच लखनऊ टीममध्ये क्विंटन डी कॉक याचं कमबॅक झालं आहे. तर मोहसिन खान प्लेईंग ईलेव्हनमधून बाहेर पडला आहे.

दोघांची स्थिती सारखीच

पॉइंट्स टेबलमध्ये लखनऊ आणि हैदराबाद या दोन्ही संघांची स्थिती सारखीच आहे. दोन्ही संघांनी 11 पैकी 6 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 5 वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. हैदराबाद पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या आणि लखनऊ सहाव्या स्थानी विराजमान आहे. दोन्ही संघांचे पॉइंट्स हे सारखेच आहेत. मात्र लखनऊच्या तुलनेत हैदराबादचा नेट रनरेट चांगला असल्याने ते चौथ्या स्थानी आहेत.

लखनऊने टॉस जिंकला

लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन : केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), क्विंटन डी कॉक, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, दीपक हुडा, कृणाल पंड्या, कृष्णप्पा गौथम, यश ठाकूर, रवी बिश्नोई आणि नवीन-उल-हक.

सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, सनवीर सिंग, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, विजयकांत व्यासकांत आणि टी नटराजन.