
आयपीएलच्या 18 व्या मोसमात (IPL 2025) आतापर्यंत अनेक युवा खेळाडूंनी आपली छाप सोडली आहे. अनेक खेळाडूंनी आपल्या कामगिरीने दिग्ग्जांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यापैकी एक म्हणजे दिल्ली कॅपिट्ल्सचा विपराज निगम. ऑलराउंडर असलेला विपराज निगम हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेशचं प्रतिनिधित्व करतो. दिल्ली विपराजला 50 लाख रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं. विपराजने फिरकी बॉलिंगने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. विपराजने क्रिकबझला दिलेल्या मुलाखतीत त्याला बॉलिंगचे धडे देणाऱ्या गुरुचा उल्लेख केला. विपराजने ज्याच्याकडून स्पिन बॉलिंगची बाराखडी गिरवली आहे त्याच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप आहे.
विपराजने पाकिस्तानचा माजी लेग स्पिनर यासिर शाहकडून स्पिन बॉलिंगचे धडे घेतले आहेत. यासिर शाहवर 2002 साली इस्लामाबादमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आलं होता. मात्र त्यानंतर यासिर शाह याचं एफआयआरमधून नाव हटवण्यात आलं. आता विपराज फिरकी बॉलिंग शिकायला पाकिस्तानमध्ये गेला होता की यासिर शाह भारतात आला होता?असा प्रश्न उपस्थित होतं स्वाभाविक आहे. मात्र असं काहीही झालं नाही. विपराजने यासिर शाहच्या बॉलिंगचे व्हीडिओ पाहून फिरकीची कला आत्मसात केली.
“यासिर शाह ज्या पद्धतीने लेग स्पिन करायचे त्यानुसार मी बॉलिंग करायला सुरुवात केली आहे. मी यासिर शाह हे एकमेव असेल स्पिनर आहेत ज्यांना मी पाहिलंय आणि फॉलो केलं आहे. मला पण त्यांच्यासारखी बॉलिंग करायची आहे, असा मी विचार केला. मला वाटलं काही अशा गोष्टी आहेत ज्या मी त्यांच्याकडून शिकू शकतो”, असं विपराजने क्रिकबझला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
विपराजने लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पदार्पण केलं. विपराजने पदार्पणात एडम मारक्रम याला आऊट केलं. तसेच 14 बॉलमध्ये 39 धावांची खेळी केली.विपराजला सनरायजर्स हैदराबादविरुद्ध काही खास करत आलं नाही. मात्र विपराजने चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध दणका उडवून दिला. विपराजने सीएसके विरुद्ध 4 ओव्हरमध्ये 27 धावा देऊन 2 विकेट्स घेतल्या. विपराजने डेव्हॉन कॉनव्हे आणि शिवम दुबे या दोघांना आऊट केलं.