IPL 2025 GT vs DC Live Streaming : गुजरात पाचव्या विजयासाठी सज्ज, दिल्लीसमोर पहिलं स्थान कायम राखण्याचं आव्हान

Gujarat Titans vs Delhi Capitals Live Streaming : गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिट्ल्स या दोन्ही संघांचा आयपीएलच्या 18 व्या मोसमातील प्रवास सारखाच रागिला आहे. त्यामुळे आता हे दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध कशी कामगिरी करतात? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

IPL 2025 GT vs DC Live Streaming : गुजरात पाचव्या विजयासाठी सज्ज, दिल्लीसमोर पहिलं स्थान कायम राखण्याचं आव्हान
GT vs DC Preview Ipl 2025
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 18, 2025 | 11:56 PM

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 35 व्या सामन्यात शनिवारी 19 एप्रिलला 2 टेबल टॉपर संघ आमनेसामने असणार आहेत. या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यात लढत होणार आहे. शुबमन गिल गुजरातचं नेतृत्व करणार आहे. तर अक्षर पटेल याच्याकडे दिल्लीच्या कर्णधारपदाची धुरा आहे. दिल्ली आणि गुजरात या मोसमातील यशस्वी संघांपैकी एक आहेत. त्यामुळे दिल्ली आणि गुजरात यांच्यातील सामन्यात क्रिकेट चाहत्यांना रस्सीखेच पाहायला मिळण्याची अधिक शक्यता आहे. तसेच हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे गुजरात टीमला घरच्या स्थितीचा अधिक फायदा होऊ शकतो.

नंबर एक होण्याची लढाई

दिल्ली कॅपिट्ल्स आणि गुजरात टायटन्स यांचा हा या मोसमातील हा सातवा सामना असणार आहे. दिल्लीने याआधी 6 पैकी 5 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. दिल्ली 10 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी आहे. दिल्लीचा नेट रनरेट हा +0.744 असा आहे. तर दुसऱ्या बाजूला गुजरातने दिल्लीच्या तुलनेत 1 सामना अधिकचा गमावला आहे. गुजरातने 6 पैकी 4 सामने जिंकले आहेत. तर गुजरातला 2 वेळा पराभूत व्हावं लागलं आहे. गुजरातचा नेट रनरेट हा +1.081 असा आहे.

गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामना केव्हा?

गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामना शनिवारी 19 एप्रिलला खेळवण्यात येणार आहे.

गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामना कुठे?

गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामना नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे आयोजित करण्यात आला आहे.

गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामन्याला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 3 वाजता टॉस होईल.

गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळणार?

गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामना मोबाईलवर कुठे पाहता येणार?

गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामना मोबाईलवर जिओस्टार एपवर पाहायला मिळेल.

दिल्लीसमोर गुजरातविरुद्धच्या सामन्यात पहिलं स्थान कायम राखण्याचं आव्हान असणार आहे. दिल्लीने गुजरातपेक्षा 1 सामना जास्त जिंकला आहे. मात्र दिल्लीचा नेट रनरेट हा गुजरातपेक्षा कमी आहे. त्यामुळे दिल्लीला पहिलं स्थान कायम राखण्यासाठी गुजरातविरुद्ध कोणत्याही स्थितीत जिंकावं लागेल.