DC vs RR : दिल्ली कॅपिट्ल्सची सुपर ओव्हरमध्ये राजस्थानवर मात, अक्षर पटेलच्या नेतृत्वात एकूण पाचवा विजय
Delhi Capitals vs Rajasthan Royals Super Over Match Result : दिल्ली कॅपिट्ल्सने सुपर ओव्हरमध्ये राजस्थान रॉयल्सवर एकतर्फी विजय मिळवला आहे. दिल्लीने विजयासाठी मिळालेलं 13 धावांचं आव्हान हे 4 चेंडूतच पूर्ण केलं.

दिल्ली कॅपिट्ल्सने अक्षर पटेल याच्या नेतृत्वात आयपीएलच्या 18 व्या मोसमातील एकूण पाचवा विजय मिळवला आहे. या मोसमातील 32 व्या सामन्यात दिल्ली विरुद्ध राजस्थान आमनेसामने होते. मात्र सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये पोहचला. दिल्लीने त्यानंतर राजस्थानवर सुपर ओव्हरमध्ये मात करत हा विजय साकारला.राजस्थानने दिल्लीला सुपर ओव्हरमध्ये विजयासाठी 12 धावांचं आव्हान दिलं होतं. दिल्लीने हे आव्हान 2 चेंडू राखून पूर्ण केलं. दिल्लीने 4 बॉलमध्ये 13 धावा केल्या. केएल राहुल आणि ट्रिस्टन स्टब्स या जोडीने या 13 धावा करुन दिल्लीला विजय मिळवून दिला. त्याआधी दिल्लीने राजस्थानला विजयासाठी 189 धावांचं आव्हान दिलं होतं. राजस्थानला विजयासाठी शेवटच्या बॉलवर 2 धावांची गरज होती. तेव्हा अक्षर पटेल याने स्ट्राईक एंडवर केलेल्या थ्रोवर विकेटकीपर केएल राहुल याने ध्रुव जुरेलला रन आऊट केलं. त्यामुळे सामना बरोबरीत सुटला.
राजस्थान 9 धावा करण्यात अपयशी
दरम्यान राजस्थान शेवटच्या ओव्हरमध्ये 9 धावा करण्यात अपयशी ठरली. शिमरॉन हेटमायर आणि ध्रुव जुरेल ही जोडी मैदानात होती.दिल्लीकडून मिचेल स्टार्क बॉलिंगसाठी आला. स्टार्कने चिवट बॉलिंग केली. स्टार्कने पहिल्या 4 बॉलमध्ये 5 धावा दिल्या. तर पाचव्या बॉलवर राजस्थानच्या जोडीला 2 धावा घेण्याची संधी होती. मात्र ध्रुव जुरेल याने चूक केली. त्यामुळे राजस्थानला एकच धाव मिळाली. त्यामुळे राजस्थानला विजयासाठी शेवटच्या बॉलवर 2 रन्स पाहिजे होत्या. मात्र ध्रुव दुसरी धाव घेताना रन आऊट झाला. त्यामुळे राजस्थानही 188 धावाच करु शकली आणि सामना टाय झाला.
दिल्लीचा सुपर ओव्हरमध्ये विजय
📁 TATA IPL ↳ 📂 Super Over
Another day, another #TATAIPL thriller! 🤩
Tristan Stubbs wins the Super Over for #DC in style! 🔥
Scorecard ▶ https://t.co/clW1BIPA0l#DCvRR pic.twitter.com/AXT61QLtyg
— IndianPremierLeague (@IPL) April 16, 2025
राजस्थानची बॅटिंग
राजस्थानकडून नितीश राणा आणि यशस्वी जयस्वाल या दोघांनी सर्वाधिक आणि प्रत्येकी 51-51 धावा केल्या. कॅप्टन संजू सॅमसन रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर गेला. संजूने 31 धावा केल्या. रियान पराग याने 8 धावा जोडल्या. ध्रुव जुरेल याने 17 चेंडूत 26 धावा केल्या. तर शिमरॉन हेटमायर याने नाबाद 15 धावा केल्या. तर दिल्लीकडून मिचेल स्टार्क, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
