6,6,6,6,6,6, रियान परागचा ‘कार’नामा, सलग 6 बॉलमध्ये 6 सिक्स, व्हीडिओ व्हायरल

Riyan Parag 6 Sixes Ipl 2025 : राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज आणि कर्णधार रियान पराग याने ईडन गार्डन्समध्ये दुसऱ्या डावात सलग 6 बॉलमध्ये 6 सिक्स ठोकले आहेत.

6,6,6,6,6,6, रियान परागचा कारनामा, सलग 6 बॉलमध्ये 6 सिक्स, व्हीडिओ व्हायरल
Riyan Parag 6 sixes KKR vs RR IPL 2025
Image Credit source: PTI
| Updated on: May 04, 2025 | 8:47 PM

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग याने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध आयपीएल 2025 मधील 53 व्या सामन्यात अविस्मरणीय आणि स्फोटक खेळी करत सलग 6 बॉलमध्ये 6 सिक्स ठोकले. मात्र रियानने हे 6 सिक्स एका ओव्हरमध्ये लगावले नाहीत. रियानने मोईन अली याच्या ओव्हरमधील शेवटच्या 5 चेंडूत सलग 5 षटकार लगावले. तर त्यानंतर रियानने मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती याच्या ओव्हरमधील दुसऱ्याच बॉलवर सिक्स लगावला. रियानने अशाप्रकारे सलग 6 चेंडूत 6 षटकार पूर्ण केले.

6 बॉलमध्ये सलग 6 सिक्स

रियानने राजस्थानच्या डावातील 13 व्या ओव्हरमधील शेवटच्या 5 चेंडूंमध्ये सलग 5 लगावले. मोईन अली याने राजस्थानच्या डावातील 13 वी ओव्हर टाकली. त्यानंतर वरुण चक्रवर्ती 14 वी ओव्हर टाकायला आला. शिमरॉन हेटमायर याने 14 व्या ओव्हरमधील पहिला चेंडू खेळला. शिमरॉनने पहिल्या बॉलवर 1 रन घेत रियानला स्ट्राईक दिली. रियानने या 14 व्या ओव्हरमधील दुसऱ्या चेंडूवर षटकार खेचला. रियानने अशाप्रकारे सलग 6 बॉलमध्ये 6 सिक्स पूर्ण केले. मात्र रियान एका ओव्हरमध्ये ही कामगिरी करु शकला नाही.

रियान परागची फटकेबाजी

दिग्गजांच्या यादीत स्थान

रियानने या कामगिरीसह दिग्गज फलंदाजांच्या यादीत स्थान पटकावलं आहे. रियानच्या आधी आयपीएलमध्ये एका ओव्हरमधील 5 चेंडूत 5 षटकार लगावण्याची कामगिरी 4 फलंदाजांनी केली आहे. या 4 फलंदाजांमध्ये ख्रिस गेल, राहुल तेवतिया, रवींद्र जडेजा आणि रिंकु सिंह यांचा समावेश आहे.

रियानची 95 धावांची खेळी

रियानचं शतक अवघ्या 5 धावांनी हुकलं. रियानने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध 45 बॉलमध्ये 8 सिक्स आणि 6 फोरसह 95 रन्स केल्या. रियानची ही या मोसमातील सर्वोच्च धावसंख्या ठरली.

राजस्थानसमोर 207 धावांचं आव्हान

दरम्यान कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्ससमोर 206 धावांचं आव्हान ठेवलं आहे. केकेआरने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 206 धावा केल्या. केकेआरसाठी आंद्रे रसेल याने सर्वाधिक 57 धावा केल्या. तर अंगकृष रघुवंशी याने 44 रन्स केल्या.