IPL 2025 LSG vs DC Live Streaming: लखनौ सुपर जायंट्सकडे पराभवाची परतफेड करण्याची संधी, दिल्ली कॅपिट्ल्सला लोळवणार?

Lucknow Super Giants vs Delhi Capitals Live Streaming: दिल्ली कॅपिट्ल्स आणि लखनौ सुपर जायंट्स दोन्ही संघ 24 मार्चनंतर पुन्हा एकदा आमनेसामने असणार आहेत. लखनौकडे या सामन्यात पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे.

IPL 2025 LSG vs DC Live Streaming: लखनौ सुपर जायंट्सकडे पराभवाची परतफेड करण्याची संधी, दिल्ली कॅपिट्ल्सला लोळवणार?
LSG vs DC Live Steaming IPL 2025
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 22, 2025 | 12:47 AM

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 40 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स आमनेसामने असणार आहेत. ऋषभ पंत लखनौ सुपर जायंट्सचं तर अक्षर पटेल दिल्ली कॅपिट्ल्सचं नेतृ्त्व करणार आहे. दिल्लीचा हा या मोसमातील आठवा तर लखनौचा नववा सामना असणार आहे. तसेच दोन्ही संघांची या मोसमात साखळी फेरीत आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ असणार आहे. दिल्लीने याआधीच्या सामन्यात लखनौवर विजय मिळवला होता. त्यामुळे आता लखनौकडे या पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे. आता यात कोण यशस्वी होतं? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

दिल्ली कॅपिट्ल्स आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन्ही संघांनी 24 मार्चला एकमेकांविरूद्धच्या सामन्याने मोहिमेची सुरुवात केली होती. तेव्हा दिल्लीने लखनौवर 1 विकेट्सने विजय मिळवला होता. त्यामुळे लखनौला या मोहिमेत विजयी सलामी देता आली नाही. मात्र त्यानंतर आता लखनौकडे या पराभवाची परतफेड करण्याची सुवर्णसंधी आहे. आता लखनौ या संधीचा फायदा घेणार की दिल्ली पुन्हा अस्मान दाखवणार? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामना केव्हा?

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामना मंगळवारी 22 एप्रिलला खेळवण्यात येणार आहे.

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामना कुठे?

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामना भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियम, लखनौ येथे होणार आहे.

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल.

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामना मोबाईलवर लाईव्ह जिओहॉटस्टार एपवर पाहता येईल.

पॉइंट्स टेबलमधील स्थिती

दरम्यान दिल्लीने 7 पैकी 5 सामने जिंकले आहेत. तर फक्त 2 सामन्यांत पराभव झाला आहे. दिल्ली पॉइंट्स टेबलमध्ये 10 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. दिल्लीचा नेट रनरेट हा +0.589 असा आहे. तर दुसऱ्या बाजूला लखनौने 8 पैकी 5 सामने जिंकलेत तर 3 गमावले आहेत. लखनौ 10 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानी आहे. लखनौचा नेट रनरेट हा +0.088 असा आहे.