DC vs LSG : पूरन-मार्शची स्फोटक खेळी, दिल्लीसमोर 210 धावांचं आव्हान, लखनौ जिंकणार?

Delhi Capitals vs Lucknow Super Giants 1st Innings Highlights In Marathi : निकोलस पूरन आणि मिचेल मार्श या दोघांनी केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर लखनौने 200 पार मजल मारली आहे.

DC vs LSG : पूरन-मार्शची स्फोटक खेळी, दिल्लीसमोर 210 धावांचं आव्हान, लखनौ जिंकणार?
Mitchell Marsh and Nicholas Pooran
Image Credit source: @LucknowIPL X Account
| Updated on: Mar 24, 2025 | 10:00 PM

लखनौ सुपर जायंट्सने आयपीएलच्या 18 व्या मोसमातील आपल्या पहिल्याच सामन्यात धमाकेदार सुरुवात केली आहे. लखनौने या मोहिमेतील पहिल्याच सामन्यात 200 पार मजल मारली आहे. लखनौने दिल्ली कॅपिट्ल्ससमोर 210 धावांचं आव्हान ठेवलं आहे. लखनौने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 209 धावा केल्या. लखनौसाठी निकोलस पूरन आणि मिचेल मार्श या दोघांनी सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. तर एडन मारक्रम आणि डेव्हिड मिलर या दोघांनी छोटेखानी पण महत्त्वाची खेळी केली. दिल्लीच्या गोलंदाजांना लखनौला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखण्यात यश आलं. आता दिल्लीचे फलंदाज 210 धावांचं आव्हान गाठणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

लखनऊची बॅटिंग

लखनऊसाठी निकोलस पूरन याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. पूरनने 30 बॉलमध्ये 7 सिक्स आणि 6 फोरसह 75 रन्स केल्या. तर मिचेल मार्श याने 6 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 72 धावांची तडाखेदार खेळी केली. ओपनर एडन मारक्रमने 15 धावा जोडल्या. तर डेव्हिड मिलर याने अखेरच्या क्षणी फटकेबाजी करत लखनौला 200 पार पोहचवण्यात निर्णायक भूमिका बजावली.

मिलरने 19 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 1 फोरसह नॉट आऊट 27 रन्स केल्या. तर त्याव्यतिरिक्त इतरांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. शाहबाज अहमद याने 9 आणि आयुष बदोनीने 4 धावा केल्या. कॅप्टन ऋषभ पंत, शार्दुल ठाकुर आणि रवी बिश्नोई या तिघांना भोपळाही फोडता आला नाही. दिल्लीसाठी मिचेल स्टार्क याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. कुलदीप यादवने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर विपराज निगम आणि मुकेश कुमार या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

लखनऊच्या 209 धावा

लखनौ सुपर जायंट्स प्लेइंग ईलेव्हन : एडन मार्कराम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, आयुष बडोनी, ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), डेव्हिड मिलर, प्रिन्स यादव, दिग्वेश राठी, शाहबाज अहमद, शार्दूल ठाकुर आणि रवी बिश्नोई.

दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन : जेक फ्रेझर-मॅकगुर्क, फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), समीर रिझवी, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा आणि मुकेश कुमार.