
पंजाब किंग्सचा (Punjab Kings) कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने 1 एप्रिलला लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या (Lucknow Super Giants) सामन्यात स्फोटक खेळी केली. श्रेयसने 172 धावांचा पाठलाग करताना 30 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 3 फोरसह नॉट आऊट 52 रन्स केल्या. श्रेयसने या खेळीसह ऑरेंज कॅपच्या (IPL 2025 Orange Cap) शर्यतीत मोठी झेप घेतली आहे. श्रेयस थेट 12 स्थानांची झेप घेतली आहे. श्रेयस 14 वरुन दुसर्या स्थानी पोहचला आहे. श्रेयस दुसऱ्या स्थानी पोहचल्याने ऑरेंज कॅपच्या शर्यतीत पहिल्या स्थानी असलेल्या निकोलस पूरन (Nicholas Pooran) याचं टेन्शन वाढलं आहे. श्रेयसने दुसऱ्या स्थानी झेप घेत पूरनची डोकेदुखी वाढवली आहे.
श्रेयस अय्यर लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्याआधी ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आसपासही नव्हता. श्रेयस 14 व्या क्रमांकावर होता. मात्र एका खेळीसह सर्व चित्रच बदललं. श्रेयसच्या नावावर अवघ्या 2 सामन्यांमध्ये 149 धावा झाल्या आहेत. तर पूरनने श्रेयसच्या तुलनेत 1 सामना जास्त खेळला आहेत. पूरन 3 सामन्यात 189 धावांसह पहिल्या स्थानी आहे. पूरनने पंजाबविरुद्ध 30 बॉलमध्ये 44 धावा केल्या. पूरन या खेळीसह ऑरेंज कॅप स्वत:कडे ठेवण्यात यशस्वी ठरला.
श्रेयसने दुसऱ्या स्थानी झेप घेतल्याने अनिकेत वर्माला (Aniket Varma) झटका लागला आहे. अनिकेत टॉप 5 मधून बाहेर झाला आहे. निकोलस पूरन आणि श्रेयस अय्यर या दोघांमध्ये ऑरेंज कॅपसाठी चुरस आहे. तर या दोघांव्यतिरिक्त गुजरात टायटन्सचा (Sai Sudharsan) साई सुदर्शन, सनरायजर्स हैदराबादचा ट्रेव्हिस हेड (Travis Head) आणि लखनौ सुपर जायंट्सचा मिचेल मार्श (Mitchell Marsh) टॉप 5 मध्ये आहेत.
निकोलस पूरन ऑरेंज कॅपचा मानकरी
LSG’s Nicholas Pooran and CSK’s Noor Ahmad are leading the Orange Cap and Purple Cap leaderboards. pic.twitter.com/DWcbVH0Cou
— CricTracker (@Cricketracker) April 1, 2025
दरम्यान साई सुदर्शन याला ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आणखी पुढे येण्याची संधी आहे. ताज्या आकडेवारीनुसार, साई या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. बुधवारी 2 एप्रिलला गुजरातचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध होणार आहे. साईने या सामन्यात 53 धावा केल्यास तो ऑरेंज कॅपचा मानकरी ठरेल.