IPL 2025 Point Table : दिल्ली कॅपिटल्स टॉपला, तर राजस्थान रॉयल्सला बसला फटका; काय झालं वाचा

आयपीएल 2025 स्पर्धेत प्रत्येक सामन्यानंतर गुणतालिकेत उलथापालथ होताना दिसत आहे. राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स या सामन्यानंतर असंच चित्र पाहायला मिळालं. या सामन्यात राजस्थानच्या विजयामुळे दिल्लीला मात्र फटका बसला आहे.

IPL 2025 Point Table : दिल्ली कॅपिटल्स टॉपला, तर राजस्थान रॉयल्सला बसला फटका; काय झालं वाचा
दिल्ली कॅपिटल्स
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 17, 2025 | 1:31 AM

आयपीएल 2025 स्पर्धेतील 32 सामने पार पडले आहेत. दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स या सामन्यानंतर गुणतालिकेचं चित्र बदललं आहे. राजस्थान रॉयल्सने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी गमवून 188 धावा केल्या आणि विजयासाठी 189 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना 188 धावाच झाल्या आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. हा सामना सुपर ओव्हरमध्ये कोण जिंकणार याची उत्सुकता होती. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना 5 चेंडूत 2 गडी गमवून 11 धावा केल्या आणि विजयासाठी 12 धावा दिल्या. हा सामना दिल्ली कॅपिटल्सने 4 चेंडूत जिंकला. चौथ्या चेंडूवर स्टब्सने षटकार मारला आणि सामन्यात विजय मिळवला.

या विजयामुळे गुणतालिकेतील चित्र मात्र बदललं आहे. गुणतालिकेत दोन बदल झाले आहेत. दिल्ली कॅपिटल्सने 10 गुणांसह टॉपचं स्थान गाठलं आहे. दिल्लीचा नेट रनरेट हा 0.744 इतका आहे. गुजरात टायटन्स 8 गुण आणि 1.081 नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु 8 गुण आणि 0.672 नेट रनरेटसह तिसऱ्या, पंजाब किंग्स 8 गुण आणि 0.172 नेट रनरेटसह चौथ्या, लखनौ सुपर जायंट्स 8 गुण आणि 0.086 नेट रनरेटसह पाचव्या स्थानी आहे.

कोलकाता नाईट रायडर्स 6 गुण आणि 0.547 नेट रनरेटसह सहाव्या स्थानावर आहे. राजस्थान रॉयल्सच्या पराभवामुळे मुंबई इंडियन्सला फायदा झाला आहे. मुंबई इंडियन्सचं सातवं स्थान कायम आहे. मुंबई इंडियन्सने 4 गुण आणि 0.104 नेट रनरेटसह सातवं स्थानी कायम आहे. तर राजस्थान रॉयल्स 4 गुण आणि -0.714 नेट रनरेटसह आठवं स्थान, सनरायझर्स हैदराबाद 4 गुण आणि -1.245 नेट रनरेटसह नवव्या स्थानावर आहे. तर चेन्नई सुपर किंग्स 4 गुण आणि -1.276 नेट रनरेटसह दहाव्या स्थानी आहे.

पर्पल आणि ऑरेंज कॅपचे मानकरी

पर्पल आणि ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तसा काही फरक पडला नाही. ऑरेंज कॅपच्या शर्यातीत राजस्थान आणि दिल्ली सामन्यानंतर लखनौ सुपर जायंट्सचा निकोलस पूरनच पहिल्या स्थानावर आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 7 सामन्यात 357 धावा केल्या आहेत. तर गुजरात टायटन्सचा साई सुदर्शन 329 धावांसह दुसऱ्या, लखनौचा मिचेल मार्श 295 धावांसह तिसऱ्या, पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर 250 धावांसह चौथ्या, तर आरसीबीचा विराट कहोली 248 धावांसह पाचव्या स्थानावर आहे.

पर्पल कॅपच्या शर्यतीत असंच काहीसं आहे. पण कुलदीप यादवला एका विकेटचा फायदा झाला आणि थेट दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. चेन्नई सुपर किंग्सचा नूर अहमद 12 विकेटसह अजूनही टॉपला आहे. चेन्नईचा खलील अहमद तिसऱ्या, शार्दुल ठाकुर 11 विकेटसह चौथ्या आणि वरुण चक्रवर्ती 10 विकेटसह पाचव्या स्थानावर आहे.