PBKS vs RCB : पंजाब किंग्सचं 101 धावांवर पॅकअप, आरसीबी पहिल्या झटक्यात फायनलमध्ये पोहचणार?

Punjab Kings vs Royal Challengers Bengaluru Qualifier 1 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या गोलंदाजांनी पंजाबला 101 धावांवर गुंडाळलं. यासह आयपीएल प्लेऑफच्या इतिहासातील ही संयुक्तरित्या दुसरी निच्चांकी धावसंख्या ठरली.

PBKS vs RCB : पंजाब किंग्सचं 101 धावांवर पॅकअप, आरसीबी पहिल्या झटक्यात फायनलमध्ये पोहचणार?
Suyash Sharma and Yash Dayal IPL Qualifier 1
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 29, 2025 | 9:30 PM

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील पहिल्या क्वालिफायर सामन्यात पंजाब किंग्सचे फलंदाज फ्लॉप ठरले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या गोलंदाजांनी आरसीबीच्या फलंदाजांना पद्धतशीर गुंडाळलं आणि 101 रन्सवर पॅकअप केलं. त्यामुळे आता आरसीबीला पहिल्या झटक्यात अंतिम फेरीत पोहचण्यासाठी 102 धावा करायच्या आहेत. मात्र आरसीबी 102 धावा करण्यात यशस्वी ठरणार? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. कारण याच पंजाबने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध याच हंगामात 15 एप्रिल रोजी मुल्लानपूरमध्येच 111 धावांचा यशस्वी बचाव केला होता. पंजाबने केकेआरला 95 रन्सवर गुंडाळून 16 धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळे आता आरसीबी विजयी होणार की पंजाब किंग्स 15 एप्रिलची पुनरावृत्ती करत विजय मिळणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

टॉस फॅक्टर महत्त्वाचा ठरला!

आरसीबीने टॉस जिंकून कर्णधार रजत पाटीदार याने पंजाबला बॅटिंगसाठी भाग पाडलं. कॅप्टन पाटीदारचा निर्णय आरसीबीच्या गोलंदाजांनी योग्य ठरवला. आरसीबीच्या गोलंदाजांनी पंजाबच्या एकाही फलंदाजला मैदानात टिकू दिलं नाही. आरसीबीने झटक्यावर झटके दिल्याने पंजाबची घसरगुंडी झाली. पंजाबने पावरप्लेमध्येच 4 विकेट्स गमावल्या. तसेच त्यानंतरही विकेट गमावण्याची मालिका सुरुच होती. त्यामुळे पंजाबच्या 100 धावा होणार का? अशी शंका उपस्थित केली जात होती. मात्र कसंबसं पंजाबने 101 धावांपर्यंत मजल मारली.

पंजाबचे फलंदाज अपयशी

पंजाबसाठी मार्कस स्टोयनिस, अझमतुल्लाह ओमरझई आणि ओपनर प्रभसिमरन सिंह या त्रिकुटालाचा दुहेरी आकडा गाठता आला. स्टोयनिसने 17 बॉलमध्ये 2 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने सर्वाधिक 26 रन्स केल्या. प्रभसिमरन याने 10 चेंडूत 18 धावा केल्या. तर अझमतुल्लाह ओमरझई याने 12 बॉलमध्ये 18 रन्स केल्या. तर प्रियांश आर्या,जोश इंग्लिस, कर्णधार श्रेयस अय्यर, नेहल वाढेरा, शशांक सिंह आणि हरप्रीत ब्रार यांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. तर आयपीएल पदार्पण करणाऱ्या मुशीर खान भोपळा फोडण्यात अपयशी ठरला.

पंजाबचं 101 रन्सवर पॅकअप, आरसीबी जिंकणार?

आरसीबीच्या गोलंदाजांचा भेदक मारा

तर आरसीबीच्या कृणाल पंड्या याचा अपवाद वगळता इतर 5 गोलंदाज यशस्वी ठरले. जोश हेझलवूड आणि सूर्यश शर्मा या जोडीने पंजाबच्या बॅटिंगचं कंबरडं मोडलं. हेझलवूड आणि सूयश या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. तर यश दयाल याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तसेच भुवनेश्वर कुमार आणि रोमरियो शेफर्ड या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.