PBKS vs RCB : बंगळुरुने टॉस जिंकला, मॅचविनर बॉलरची एन्ट्री, पंजाबला टेन्शन, पाहा प्लेइंग ईलेव्हन
Punjab Kings vs Royal Challengers Bengaluru Qualifier 1 Toss: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीमच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. या सामन्यातून मॅचविनर गोलंदाजाची एन्ट्री झाली आहे. जाणून घ्या कोण आहे तो?

आयपीएलच्या 18 व्या हंगमातील क्वालिफायर 1 मध्ये पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुल्लानपूर, चंदीगड येथे आयोजित करण्यात आला आहे. रजत पाटीदार याच्याकडे आरसीबीच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. तर श्रेयस अय्यर पंजाबचं नेतृत्व करत आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. बंगळुरुने टॉस जिंकला. कॅप्टन रजतने फिल्डिंगचा निर्णय घेत पंजाबला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.
कॅप्टन रजत पाटीदारची एन्ट्री
रजत पाटीदार याची गेल्या 2 सामन्यांनंतर मुख्य संघात कॅप्टन म्हणून एन्ट्री झाली आहे. रजतला दुखापतीमुळे गेल्या 2 सामन्यांमध्ये नेतृत्व करता आलं नव्हतं. मात्र रजत इमपॅक्ट प्लेअर म्हणून खेळत होता. अशात जितेश शर्मा याने आरसीबीचं नेतृत्व केलं. तसेच आरसीबीत वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड याचं कमॅबक झालं आहे. हेझलवूड आल्याने नुवान तुषारा याला बाहेर व्हावं लागलं आहे. हेझलवूड याने या मोसमात आरसीबीसाठी अनेक सामन्यात निर्णायक भूमिका बजावली. त्यामुळे हेझलवूड याच्याकडून चमकदार कामगिरीची आशा आरसीबी चाहत्यांना असणार आहे.
तर दुसऱ्या बाजूला पंजाब किंग्सने प्लेइंग ईलेव्हनमध्ये 1 बदल केला आहे. मार्को जान्सेन नसल्याने अझमतुल्लाह ओमरझई याचा समावेश करण्यात आला आहे. तर विजयकुमार वैशाख हा देखील प्लेइंग ईलेव्हनमध्ये नाही. मात्र विजयकुमारला इमपॅक्ट सब्टीट्यूड खेळाडूंमध्ये संधी दिली आहे.
पंजाब किती धावा करणार?
दरम्यान मुल्लानपूरमधील या स्टेडियममधील 170-175 ही सरासरी धावसंख्या आहे. त्यामुळे पंजाब या सरासरी धावसंख्येपर्यंत पोहचणार की आरसीबीसमोर 200 पार मजल मारणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
आरसीबीने टॉस जिंकला
🚨 Toss 🚨@RCBTweets won the toss and elected to bowl against @PunjabKingsIPL in Qualifier 1⃣
Updates ▶ https://t.co/aHIgGazpRc#TATAIPL | #PBKSvRCB | #Qualifier1 | #TheLastMile pic.twitter.com/qsBei0DQqG
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2025
पंजाब किंग्स प्लेइंग ईलेव्हन : श्रेयस अय्यर (कर्णधार), प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग, जोश इंग्लिस (विकेटकीपर), नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, अजमतुल्ला ओमरझाई, हरप्रीत ब्रार, अर्शदीप सिंग आणि कायल जेमिसन.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, फिलिप सॉल्ट, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), रोमॅरियो शेफर्ड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, जोश हेजलवुड आणि सुयश शर्मा.
