
कॅप्टन श्रेयस अय्यर आणि नेहल वढेरा या जोडीने केलेल्या मॅचविनिंग खेळीच्या जोरावर पंजाब किंग्सने आयपीएलच्या 18 व्या मोसमात इतिहास घडवला आहे. पंजाब किंग्सने क्वालिफायर-2 मध्ये मुंबई इंडियन्सचा धुव्वा उडवत फायनलमध्ये धडक दिली आहे. मुंबईने पंजाबला विजयासाठी 204 धावांचं आव्हान दिलं होतं. पंजाबने हे आव्हान 19 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून पूर्ण केलं. पंजाबने 207 धावा केल्या. पंजाबने यासह आयपीएल इतिहासात 2014 नंतर पहिल्यांदा तर एकूण दुसऱ्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर मुंबईचं या पराभवासह या हंगामातील आव्हान संपुष्ठात आलं आहे.
श्रेयस अय्यर पंजाबच्या विजयाचा नायक ठरला. तर नेहल वढेरा यानेही तितकंच निर्णायक योगदान दिलं. श्रेयस अय्यरने 41 बॉलमध्ये 8 सिक्स आणि 5 फोरसह नॉट आऊट 87 रन्स केल्या. तर नहेल वढेरा याने 29 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 48 धावा केल्या. जोस इंग्लिसने 21 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 5 फोरसह 38 रन्स केल्या. प्रियांश आर्या याने 20 धावांचं योगदान दिलं. तर इतरांनीही या विजयात बॅटिंगने योगदान दिलं. तर मुंबईचे गोलंदाज आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच 200 पेक्षा अधिक धावांचा यशस्वी बचाव करण्यात अपयशी ठरले. मुंबईसाठी अश्विनी कुमारने 2 विकेट्स मिळवल्या. तर ट्रेंट बोल्ट आणि हार्दिक पंड्या या दोघांनी 1-1 विकेट मिळवली. तर मुंबईचा मॅचविनर बॉलर जसप्रीत बुमराह याला एकही विकेट मिळाली नाही. तर इतर दोघेही विकेट घेण्यात अपयशी ठरले.
त्याआधी संध्याकाळी 7 वाजता टॉस झाला. पंजाबने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. मात्र पावसामुळे सामन्याला 9 वाजून 45 मिनिटांनी सुरुवात झाली. मुंबईने 20 ओव्हरमध्ये सांघिक कामगिरीच्या जोरावर 6 विकेट्स गमावून 203 धावांपर्यंत मजल मारली. मुंबईसाठी कुणालाही अर्धशतकही करता आलं नाही. मात्र 5 फलंदाजांनी सर्वाधिक योगदान दिलं. त्यामुळे 200 पार पोहचता आलं. मुंबईसाठी सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा या दोघांनी सर्वाधिक आणि प्रत्येकी 44-44 धावा केल्या. जॉनी बॅरिस्टो याने 38 तर नमन धीरने 37 रन्स केल्या. तर इतरांनीही योगदान दिलं. तसेच पंजाबकडून अझमलुल्लाह ओमरझई याने दोघांना बाद केलं. तर कायले जेमीन्सन, मार्कस स्टोयनिस, विजयकुमार वैशाख आणि युझवेंद्र चहल या चौघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
धूम पंजाबी, मचादे धूम पंजाबी
Pressure’s loud. Those maximums were louder 🚀
🎥 Captain Shreyas Iyer puts #PBKS on the brink of a seat in the GRAND FINAL ❤
Updates ▶ https://t.co/vIzPVlDqoC#TATAIPL | #PBKSvMI | #Qualifier2 | #TheLastMile | @ShreyasIyer15 pic.twitter.com/tTiXcELxoG
— IndianPremierLeague (@IPL) June 1, 2025
दरम्यान पंजाबच्या विजयासह अंतिम फेरीतील दुसरा संघही निश्चित झाला आहे. पंजाबसमोर आता अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरुचं आव्हान असणार आहे. हा सामना 3 जून रोजी होणार आहे. दोन्ही संघांची फायनलमध्ये आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. तसेच या स्पर्धेच्या इतिहासात नवी चॅम्पियन टीम मिळणार, हे देखील स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आता 3 जून रोजी कोणता संघ ट्रॉफी उंचावतो? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.