IPL 2025 RR vs CSK Live Streaming : पहिल्या सिजनमधील फायनलिस्ट आमनेसामने, राजस्थानसमोर चेन्नईचं आव्हान

RR vs CSK Live Streaming: राजस्थान रॉयल्सने या हंगामात दोन्ही सामने गमावले आहेत. त्यामुळे राजस्थानसमोर चेन्नईविरुद्ध जिंकण्याचं आव्हान असणार आहे.

IPL 2025  RR vs CSK Live Streaming : पहिल्या सिजनमधील फायनलिस्ट आमनेसामने, राजस्थानसमोर चेन्नईचं आव्हान
Rajasthan Royals vs Chennai Super Kings Live Streaming Ipl 2025
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Mar 30, 2025 | 12:18 AM

आयपीएलच्या 18 व्या मोसमात रविवारी 30 मार्च रोजी डबल हेडरचा थरार रंगणार आहे. या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने असणार आहेत. तर त्यानंतर दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स भिडणार आहेत. दोन्ही संघांचा हा तिसरा सामना असणार आहे. चेन्नईने मुंबईवर मात करत या हंगामात विजयी सुरुवात केलीय. मात्र चेन्नईला दुसर्‍या सामन्यात पराभूत व्हावं लागलंय. तर दुसर्‍या बाजूला राजस्थानने दोन्ही सामने गमावले आहेत. त्यामुळे राजस्थानसमोर चेन्नईविरुद्ध विजय मिळवून पराभवाची हॅटट्रिक टाळण्याचं आव्हान असणार आहे.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना केव्हा?

राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना रविवारी 30 मार्चला खेळवण्यात येणार आहे.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना कुठे?

राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना बारसपारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी येथे आयोजित करण्यात आला आहे.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?

राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स लाईव्ह मॅच मोबाईलवर जिओ-हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल. तसेच टीव्ही9 मराठी वेबसाईटवर सामन्याचे लाईव्ह अपडेट जाणून घेता येतील.

चेन्नई सुपर किंग्ज टीम: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), डेव्हॉन कॉनव्हे, रचिन रवींद्र, विजय शंकर, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, एमएस धोनी (विकेटकीपर), सॅम करन, आर अश्विन, मथीशा पाथिराना, कमलेश नागरकोटी, नॅथन एलिस, मुकेश चौधरी, राहुल त्रिपाठी, दीपक हुड्डा, खलील अहमद, जेमी ओव्हरटन, शेख रशीद, अंशुल कंबोज, श्रेयस गोपाल, नूर अहमद, गुर्जपनीत सिंग, रामकृष्ण घोष, आंद्रे सिद्धार्थ सी आणि वंश बेदी.

राजस्थान रॉयल्स टीम : रियान पराग (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, नितीश राणा, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शुभम दुबे, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, तुषार देशपांडे, संदीप शर्मा, फजलहक फारुकी, कुमार कार्तिकेय, आकाश मढवाल, युद्धवीर सिंह चरक, महीश तीक्षाना, क्वेना मफाका, अशोक शर्मा, वैभव सूर्यवंशी आणि कुणाल सिंग राठौर.