आयपीएलदरम्यान मोठी बातमी, या टीमचा कॅप्टन बदलणार, कारण काय?

आयपीएल 2025 स्पर्धा सुरु असताना कर्णधार बदलण्याची वेळ आली आहे. राजस्थान रॉयल्सने तीन सामन्यानंतर कर्णधार बदलण्याचा निर्णय घेतला आहे. संजू सॅमसनच्या खांद्यावर पुन्हा एकदा जबाबदारी दिली जाणार आहे. तीन सामन्यानंतर झालं असं की..

आयपीएलदरम्यान मोठी बातमी, या टीमचा कॅप्टन बदलणार, कारण काय?
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 02, 2025 | 3:55 PM

राजस्थान रॉयल्स फ्रेंचायझीसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. तीन सामन्यात संजू सॅमसन हा इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानात उतरत होता.पण आता कर्णधारपदाची धुरा सांभाळण्यास सज्ज झाला आहे. बीसीसीआयच्या बंगळुरू येथील सेंटर ऑफ एक्सलन्सने परवानगी दिल्यानंतर पुन्हा कर्णधारपद आणि विकेटकीपिंगची जबाबदारी स्वीकारण्यास सज्ज झाला आहे. बोटाच्या दुखापतीमुळे संजू सॅमसन सुरुवातीच्या तीन सामन्यात फक्त फलंदाजीसाठी उतरला होता. तर कर्णधारपदाची तात्पुरती जबाबदारी ही रियान परागच्या खांद्यावर होती. उजव्या हाताच्या तर्जनीला दुखापत झाली होती आणि त्यामुळे शस्त्रक्रिया करावी लागली होती. त्यामुळे तीन सामन्यात इम्पॅक्ट प्लेयर नियमाचा फायदा घेऊन फक्त फलंदाजीला उतरला होता. आठवड्याच्या सुरुवातीला गुवाहाटीहून बंगळुरूला गेला होता. सीओईच्या वैद्यकीय पथकाकडून विकेटकीपिंग आणि क्षेत्ररक्षणासाठी परवानगी मिळविण्यासाठी यासाठी गेला होता. बीसीसीआयमधील एका विश्वासार्ह सूत्रांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, संजू सॅमसनने एनसीएत सर्व फिटनेस चाचण्या पास केल्या आहेत. त्यामुळे सॅमसन पुन्हा एकदा कर्णधारपदाच्या भूमिकेत दिसणार आहे. सॅमसन 5 एप्रिल रोजी मुल्लानपूर येथे पंजाब किंग्जविरुद्धच्या पुढील सामन्यात संघाचे नेतृत्व करेल .

दुखापतीमुळे सॅमसनला आयपीएलच्या सुरुवातीच्या तीन सामन्यात फक्त फक्त अंशतः खेळण्याची परवानगी मिळाली होती. म्हणजेच फलंदाजी करण्याची परवानगी होती. पण क्षेत्ररक्षण किंवा विकेटकीपिंग करू शकत नव्हता. त्यामुळे राजस्थान रॉयल्सने त्याला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळवण्याचा निर्णय घेतला आणि अष्टपैलू रियान परागला कर्णधारपद दिले. राजस्थान रॉयल्सने आयपीएल मोहिमेची संमिश्र सुरुवात केली आहे. हैदराबाद आणि कोलकात्याकडून पराभव सहन करावा लागला. तर रविवारी रात्री गुवाहाटीमध्ये चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध विजय मिळवला.

सॅमसनने आतापर्यंत खेळलेल्या तीन सामन्यांमध्ये इम्पॅक्ट प्लेअर खेळला. संजू सॅमसनने पहिल्या सामन्यात आपला इम्पॅक्ट दाखवला. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात 66, कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध 13 आणि चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध 20 धावांची खेळी केली. संजू सॅमसनच्या गैरहजेरीत ध्रुव जुरेलने विकेटकीपिंगची धुरा सांभाळली.