
आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 19 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. गुजरातच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार शुबमन गिल याने फिल्डिंगचा निर्णय घेत हैदराबादला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. गुजरातचा हा चौथा तर हैदराबादचा पाचवा तर सामना आहे. हैदराबादला गेल्या सलग 3 सामन्यांत पराभूत व्हावं लागलं आहे. त्यामुळे हैदराबादसमोर हा सामना जिंकण्याचं आव्हान असणार आहे. त्यामुळे हैदराबादला जिंकायचं असेल तर त्यांच्या फलंदाजांना पुन्हा एकदा राक्षसी खेळी करत मोठी धावसंख्या उभारावी लागणार आहे. या प्रयत्नात हैदराबादचे फलंदाज किती यशस्वी ठरतात? हे थोड्या वेळातच स्पष्ट होईल.
सनरायजर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांनी या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केले आहेत.
गुजरातकडून एकाला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदर याने गुजरात टायटन्सकडून पदार्पण केलं आहे. वॉशिंग्टनला अर्शद खान याच्या जागी संधी देण्यात आली आहे.
तसेच सनरायजर्स हैदराबादचा गोलंदाज हर्षल पटेल आजारी असल्याने खेळू शकणार नाही. त्यामुळे त्याच्या जागी जयदेव उनाडकट याला संधी देण्यात आल्याची माहिती कर्णधार पॅट कमिन्स याने दिली.
गुजरातने टॉस जिंकला
🚨 Toss 🚨@gujarat_titans won the toss and opted to bowl first against @SunRisers
Updates ▶ https://t.co/Y5Jzfr6Vv4#TATAIPL | #SRHvGT pic.twitter.com/NSQEVcAiRt
— IndianPremierLeague (@IPL) April 6, 2025
सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, कामिंडू मेंडीस, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स (कर्णधार), झीशान अन्सारी, जयदेव उनाडकट आणि मोहम्मद शमी.
गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : साई सुधारसन, शुबमन गिल (कॅप्टन), जोस बटलर (विकेटकीपर), शाहरुख खान, राहुल तेवतिया, वॉशिंग्टन सुंदर, राशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा इशांत शर्मा.