IPL 2026 : हैदराबादला मोठा झटका, स्टार खेळाडू संपूर्ण स्पर्धेतून बाहेर; बदली खेळाडूची घोषणा
SRH : सनराइजर्स हैदराबादला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार वेगवान गोलंदाज 2026 च्या आयपीएल स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी आता बदली खेळाडूची घोषणा करण्यात आली आहे.

आयपीएल स्पर्धेला रंग चढू लागला आहे, दररोज रोमहर्षक सामने होत आहेत. अशातच आता सनराइजर्स हैदराबादला मोठा धक्का बसला आहे. संघाचा वेगवान गोलंदाज ब्रायडन कार्स 2026 च्या आयपीएल स्पर्धेतून बाहेर पडला आहे. मुळचा इंग्लंडचा असलेला कार्स यंदाच्या स्पर्धेत अद्याप एकही सामना खेळू शकला नव्हता, मात्र आता त्याला दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. हैदराबादच्या संघाने त्याच्या जागी श्रीलंकेच्या दिलशान मधुशंका यांची बदली खेळाडू म्हणून घोषणा केली आहे. तो आता लवकरच ऑरेंज आर्मीमध्ये सामील होणार आहे.
पॅट कमिंन्सची कमतरता
सनराइजर्स हैदराबादची वेगवान गोलंदाजी आधीपासून कमकुवत आहे, कारण कर्णधार पॅट कमिंन्स अद्याप संघासोबत जोडलेला नाही. त्यामुळे संघाची गोलंदाजी संघर्ष करताना पहायला मिळत आहे. मात्र राजस्थान रॉयल्स विरूद्धच्या सामन्यात प्रफुल्ल हिंगे आणि साकिब हुसेन यांनी शानदार कामगिरी करत मिळून 8 विकेट घेतल्या होत्या. तरीही संघाला गोलंदाजीमध्ये अनुभवाची कमतरता जाणवत आहे.
दिलशान मधुशंकाला 75 लाख रुपये मिळणार
ब्रायडन कार्सला सनराइजर्स हैदराबादने रिटेन केले होते, मात्र रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या पहिल्या सामन्यापूर्वी सरावादरम्यान त्यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली होती. त्याच्या जागी दिलशान मदुशंकाला हैदराबादने 75 लाख रुपयांमध्ये करारबद्ध केले आहे. 25 वर्षीय मदुशंका यांनी श्रीलंकेसाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पण केले आहे. त्यांने आतापर्यंत एक टेस्ट, 28 वनडे आणि 19 टी20 सामने खेळले आहेत.
हैदराबादची गोलंदाजी कमकुवत
दरम्यान, हैदराबादचा नियमित कर्णधार पॅट कमिंस अजूनही दुखापतीतून सावरलेला नाही. पॅट कमिंन्सच्या जागी इशान किशन संघाचे नेतृत्व करत आहे. जयदेव उनाडकत आणि हर्शल पटेल अपेक्षेप्रमाणे प्रभावी ठरलेले नाहीत. त्यामुळे ब्रायडन कार्स बाहेर पडणे हैदराबाद संघासाठी मोठा धक्का आहे. प्रफुल्ल हिंगे आणि साकिब हुसेन यांनी नुकतेच पदार्पण केले आहे, त्यामुळे पुढील सामन्यांमध्ये ते किती प्रभावी ठरतील हे पाहावे लागणार आहे. तसेच संघात अनुभवी फिरकी गोलंदाजाचीही कमतरता जाणवत आहे.