6,6,6,6,6,6..! उर्विल पटेलचा लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध झंझावात, 13 चेंडूत अर्धशतकी खेळीसह मोडले इतके सारे विक्रम

आयपीएल 2026 स्पर्धेतील 53व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होत आहे. लखनौनो विजयासाठी 203 धावांचं आव्हान ठेवलं. या धावांचा पाठलाग करताना उर्विल पटेलचं वादळ घोंघावलं. त्याने वादळी अर्धशतक ठोकलं.

6,6,6,6,6,6..! उर्विल पटेलचा लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध झंझावात, 13 चेंडूत अर्धशतकी खेळीसह मोडले इतके सारे विक्रम
6,6,6,6,6,6..! उर्विल पटेलचा लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध झंझावात, 13 चेंडूत अर्धशतकी खेळीसह मोडले इतके सारे विक्रम
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 10, 2026 | 6:38 PM

आयपीएल 2026 स्पर्धेतील 53व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने चेन्नई सुपर किंग्ससमोर विजयासाठी 203 धावांचं आव्हान ठेवलं. या धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सने 6 षटकात 1 गडी गमवून 97 धावा केल्या. या खेळीत उर्विल पटेलचा झंझावात पाहायला मिळाला. कारण त्याने कोणत्याच गोलंदाजाला सोडलं नाही. समोर येईल त्या गोलंदाजाची धुलाई केली. त्यामुळे लखनौ सुपर जायंट्सच्या हातून सामना वाळूसारखा निसत असल्याचं दिसून आलं. उर्विल पटेलने 13 चेंडूत 7 षटकार आणि 1 चौकार मारत अर्धशतक पूर्ण केलं. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 384.62 चा होता. अर्धशतक ठोकल्यानंतर त्याच्या नावावर मोठा विक्रम नोंदवला गेला आहे. त्याने यशस्वी जयस्वालच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. त्यानेही 13 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं होतं. अर्धशतक ठोकल्यानंतर त्याने खिशातून चिठ्ठी काढली आणि खेळी साजरी केली.

चेन्नई सुपर किंग्सच्या 45 धावा असताना संजू सॅमसनची विकेट पडली. त्यानंतर उर्विल पटेल फलंदाजी आला आणि त्याने लखनौ सुपर जायंट्सच्या गोलंदाजीच्या चिंध्या केल्या. समोर जो गोलंदाज येईल त्याला फोडून काढलं. चौथ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर दिग्वेश राठीने संजू सॅमसनची विकेट काढली. त्यानंतर उर्विल पटेल फलंदाजीला आणि पहिल्या चेंडूवर एक धाव घेतली. आवेश खानच्या गोलंदाजीचा सामना करण्याची संधी पाचव्या षटकात उर्विल पटेलला मिळाली. या षटाकाच्या चौथ्या चेंडूवर त्याने षटकार मारला. त्यानंतर पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर षटकार मारत षटक संपवलं.

सहाव्या षटकात उर्विल पटेलचा सामना दिग्वेश राठीशी झाली. या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर स्ट्राईक मिळाली. या चेंडूवर त्याने षटकार मारला. तिसऱ्या चेंडूवर षटकार, चौथ्या चेंडूवर चौकार, पाचव्या चेंडूवर षटकार मारला. अवघ्या 15 चेंडूत ऋतुराज गायकवाडसोबत अर्धशतकी खेळी केली. सातव्या षटकात त्याचा सामना मोहम्मद शमीशी झाला. या षटाकाच्या पहिल्या चेंडूवर धाव आली नाही. पण दुसऱ्या चेंडूवर षटकार मारला. त्यानंतर एक धाव काढली आणि सहाव्या चेंडूवर स्ट्राईक मिळाली. त्या चेंडूवर एक धाव काढली आणि अर्धशतक साजरं केलं.

अर्धशतक साजरं केल्यानंतर उर्विल पटेलने खिशातून चिठ्ठी काढली. यावेळी या चिठ्ठीवर “This is for you Papa.” असं लिहिलं होतं. त्यानंतरही त्याचा आक्रमक बाणा सुरू राहिला आणि लखनौच्या पारड्यातून सामना हळूहळू खेचून घेतला. उर्विल पटेलने 10 चेंडूत 42 धावांची खेळी करत एबी डिव्हिलियर्सचा 41 धावांचा विक्रम मोडला. एबी डिव्हिलियर्सने 2015 साली मुंबई इंडियन्सविरुद्ध अशी खेळी केली होती.

Follow Us