AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 : पंजाबविरुद्धच्या सामन्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सच्या गोटात आनंदाचं वातावरण, झालं असं की…

आयपीएल 2026 स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सच्या पारड्यात पराभव पडला. त्यामुळे चेन्नईच्या चाहत्यांचा हिरमोड झाला. आता पंजाब किंग्सविरुद्ध दुसरा सामना होणार असून एक आनंदाची बातमी मिळाली आहे.

IPL 2026 : पंजाबविरुद्धच्या सामन्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सच्या गोटात आनंदाचं वातावरण, झालं असं की...
IPL 2026 : पंजाबविरुद्धच्या सामन्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सच्या गोटात आनंदाचं वातावरण, झालं असं की...Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 02, 2026 | 8:10 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी चेन्नई सुपर किंग्सने संघाची मजबूत बांधणी केली होती. संजू सॅमसनला संघात घेतल्याने बाजू भक्कम झाल्याचं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. पण पहिल्याच सामन्यात भ्रमनिरास झाला. संजू सॅमसनची बॅट काही चालली नाही. तसेच राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सवर सहज विजय मिळवला. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सचा दुसऱ्या सामन्यात कस लागणार आहे. ऋषभ पंतच्या कर्णधारपद खऱ्या अर्थाने पणावर लागणार आहे. त्यात चेन्नई सुपर किंग्सचा स्टार विकेटकीपर फलंदाज महेंद्रसिंह धोनीचं मार्गदर्शन लाभणार की नाही? असा प्रश्न आहे. कारण सुरूवातीच्या तीन चार सामन्यांना मुकणार हे सांगितलं जात होतं. पण चेन्नई सुपर किंग्स आणि महेंद्रसिंह धोनीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी महेंद्रसिंह धोनी नेट प्रॅक्टिस करताना दिसला. महेंद्रसिंह धोनी दुसऱ्या सामन्यापूर्वी नेट प्रॅक्टिस करत असल्याने शुभ संकेत मिळत आहेत.

दोन आठवडे धोनी खेळणार नाही!

आयपीएल स्पर्धेपूर्वी महेंद्रसिंह धोनीच्या पोटरीला दुखापत झाल्याची माहिती समोर आली. चेन्नई सुपर किंग्सने त्याच्या दुखापतीची माहिती देत सांगितलं होतं की, धोनी दुखापतग्रस्त असून दोन आठवडे खेळणार नाही. पण दुसऱ्या सामन्यापूर्वी नेट प्रॅक्टिस सुरू केल्याने क्रीडाप्रेमींच्या आशा वाढल्या आहेत. पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरेल की नाही? याबाबतही कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. महेंद्रसिंह धोनीला संधी मिळाली तरी तो इम्पॅक्ट प्लेयर म्हणूनच असेल. कारण विकेटकीपिंगसाठी चेन्नई सुपर किंग्सकडे संजू सॅमसनचा पर्याय आहे.

आयपीएल 2025 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सची कामगिरी निराशाजनक होती. या स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सचा संघ 10व्या स्थानावर होता. त्यामुळे यंदा नव्याने संघ बांधणी केली आहे. पण या पर्वाची सुरूवातही पराभवाने झाल्याने सीएसके चाहत्यांची धाकधूक वाढली आहे. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा संघ 127 धावा करू शकला. हे आव्हान राजस्थानने 13व्या षटकात पूर्ण केलं. आता पंजाब किंग्सविरुद्ध सामना होणार आहे. हा सामना चेन्नईचं होमग्राउंड चेपॉकवर होणार आहे. त्यामुळे या सामन्यात विजयासाठी प्रयत्न असेल.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा