AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

DC vs MI : मुंबईचा मोठा निर्णय, कॅप्टन बदलला, सूर्यकुमार यादव याच्याकडे नेतृत्व

Mumbai Indians Captain : मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यातील सामना अरुण जेटली स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. मुंबईने या सामन्यासाठी कर्णधार बदलला आहे.

DC vs MI : मुंबईचा मोठा निर्णय, कॅप्टन बदलला, सूर्यकुमार यादव याच्याकडे नेतृत्व
Suryakumar Yadav Mumbai IndiansImage Credit source: Mumbai Indians Website
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Apr 04, 2026 | 6:18 PM
Share

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील आठव्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने आहेत. या सामन्याला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 3 वाजता टॉस झाला. होम टीम दिल्लीच्या बाजूने नाणेफेकीचा कौला लागला. कॅप्टन अक्षर पटेल याने फिल्डिंगचा निर्णय घेत मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. मुंबईने दिल्ली विरूद्धच्या सामन्यात कर्णधार बदलला आहे. पलटणने हार्दिक पंड्या याच्या जागी मुंबईकर सूर्यकुमार यादव याला नेतृत्वाची जबाबदारी दिली आहे.

मुंबई इंडियन्समध्ये कॅप्टनसह एकूण 3 बदल

सूर्याने टॉसनंतर प्रेझेंटेटर रवी शास्त्री यांच्यासह बोलताना हार्दिकबाबत माहिती दिली. “हार्दिकची तब्येत ठीक नाही. हार्दिक आजच्या मॅचसाठी फिट नव्हता. त्यामुळे मी त्याच्या जागी नेतृत्व करतोय”, असं सूर्याने म्हटलं. पलटणने दीपक चाहर, कॉर्बिन बॉश आणि मिचेल सँटनर या तिघांना संधी दिली आहे. तर हार्दिक पंड्या, ट्रेन्ट बोल्ट आणि अल्लाह गजनफर या तिघांना प्लेइंग ईलेव्हनमधून बाहेर व्हावं लागलं आहे. तर दिल्ली कॅपिट्ल्सने प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

दोन्ही संघांची कामगिरी

मुंबई आणि दिल्ली दोन्ही संघांनी आयपीएल 2026 मधील आपला पहिला सामना जिंकला आहे. मुंबईने केकेआर तर दिल्लीने लखनौवर मात केली आहे. अशात आता या दोघांपैकी कोणता संघ सलग दुसरा सामना जिंकण्यात यशस्वी ठरणार? याकडे क्रिकेट चाहत्यांची करडी नजर असणार आहे.

पॉइंट्स टेबलमध्ये दिल्ली-मुंबई कितव्या स्थानी?

दरम्यान दिल्ली आणि मुंबई पॉइंट्स टेबलमध्ये पाठोपाठ आहेत. दोन्ही संघांच्या खात्यात प्रत्येकी 2-2 गुण आहेत. मात्र मुंबईच्या तुलनेत नेट रनरेट चांगला असल्याने दिल्ली चौथ्या स्थानी आहे. तर मुंबई पाचव्या क्रमांकावर विराजमान याहे. मुंबईचा नेट रनरेट हा +0.687 असा आहे. तर दिल्लीचा एनआरआर +1.397 इतका आहे.

सूर्यादादाकडे पलटणच्या नेतृत्वाची धुरा

दिल्ली कॅपिट्ल्स प्लेइंग ईलेव्हन : केएल राहुल (विकेटकीपर), पथुम निसांका, नितीश राणा, अक्षर पटेल (कॅप्टन), ट्रिस्टन स्टब्स, डेव्हीड मिलर, विपराज निगम, लुंगी एनगिडी, कुलदीप यादव, टी नटराजन आणि मुकेश कुमार.

मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (डब्ल्यू), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), नमन धीर, शेरफेन रदरफोर्ड, मिचेल सँटनर, कॉर्बिन बॉश, शार्दुल ठाकूर, दीपक चहर आणि जसप्रीत बुमराह.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा