IPL 2026: 25 कोटींच्या खेळाडूबाबत निर्णय घेण्याचा अधिकार नाही! अजिंक्य रहाणेच्या वक्तव्याने खळबळ

आयपीएल 2026 स्पर्धेतील पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. मुंबई इंडियन्सने 6 गडी राखून पराभूत केलं. पण या सामन्यात केकेआरच्या कर्णधारांना एक निर्णय घेण्याची मनाई होती. नेमकं काय ते अजिंक्य रहाणे बोलून गेला.

IPL 2026: 25 कोटींच्या खेळाडूबाबत निर्णय घेण्याचा अधिकार नाही! अजिंक्य रहाणेच्या वक्तव्याने खळबळ
IPL 2026: 25 कोटींच्या खेळाडूबाबत निर्णय घेण्याचा अधिकार नाही! अजिंक्य रहाणेच्या वक्तव्याने खळबळ
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Mar 30, 2026 | 5:14 PM

आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्सने पहिल्याच सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली. एक तर 14 वर्षांनी मुंबईने पहिला सामना जिंकला. तसेच आयपीएलच्या इतिहासात 220 धावांचा यशस्वी पाठलाग केला. केकेआरने या सामन्यात गोलंदाजीत एकदम सुमार प्रदर्शन केलं. खरं तर अजिंक्य रहाणे चौथ्या षटकानंतर मैदानाबाहेर गेला. त्यामुळे कर्णधारपदाची धुरा रिंकु सिंहच्या खांद्यावर आली. असं असताना गोलंदाजीचे चांगले पर्याय असूनही त्याची निवड योग्यरितीने करता आली नहाी. खरं तर केकेआरने मिनी लिलावात 25.20 कोटी खर्च करून अष्टपैलू कॅमरून ग्रीनला घेतलं. आतापर्यंत आयपीएल स्पर्धेतील सर्वात महागडा विदेशी खेळाडू ठरला. त्याच्याकडून फलंदाजीत फारसं योगदान मिळालं नाही. तर गोलंदाजीत त्याचा वापर करता आला नाही. खरं तर त्याला गोलंदाजी द्यावी असं कर्णधार अजिंक्य रहाणेला वाटलं होतं. पण तसं करता आलं नाही. याबाबतची खंत त्याने सामन्यानंतर बोलून दाखवली.

केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेला सामन्यानंतर एक प्रश्न विचारला गेला. त्यात कॅमरून ग्रीनला गोलंदाजी का दिली नाही? असं विचारलं गेलं. तेव्हा अजिंक्य रहाणेने सांगितलं की, याचं उत्तर तुम्ही माझ्याकडून नाही तर क्रिकेट ऑस्ट्रेलियाला जाऊन विचारा. आता प्रश्न असा आहे की, आयपीएल स्पर्धा बीसीसीआयच्या आखत्यारित येते. मग हा प्रश्न क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा का विचारावा? तर त्याचं उत्तर असं आहे की, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कॅमरून ग्रीनला लोअर बॅक इंजरी असल्याचं सांगत त्याला गोलंदाजी देऊ नका असं केकेआर व्यवस्थापनाला सांगितलं आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केलं की, आम्ही कॅमरून ग्रीनच्या दुखापतीबाबत कोलकाता नाईट रायडर्स व्यवस्थापनाला माहिती दिली आहे. ग्रीनची दुखापत आता मॅनेज करण्याची गरज आहे. त्यामुळे कमीत कमी 10-12 दिवस गोलंदाजी करू शकत नाही. त्यामुळे कॅमरून ग्रीन आणखी तीन चार सामने गोलंदाजी करणार नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळे केकेआरची दमछाक होणार आहे. कॅमरून ग्रीन म्हणजे संघातील पांढरा हत्ती असंच आता क्रीडाप्रेमींना वाटत आहे. संघात असून नसल्यासारखा आहे. यापूर्वी कॅमरून ग्रीन मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी खेळला आहे.

Follow Us