AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RCB vs GT: गुजरातला दोन चुका भोवल्या आणि बसला 79 धावांचा फटका, प्रसिद्धच्या षटकात झालं असं की..

आयपीएल 2026 स्पर्धेच्या क्वॉलिफायर 1 सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात टायटन्ससमोर विजयासाठी 254 धावांचं मोठं आव्हान ठेवलं आहे. या धावांमध्ये 79 धावांचा फटका बसला आहे. दोन चुका एकाच षटकात केल्याने हा फटका बसला.

RCB vs GT: गुजरातला दोन चुका भोवल्या आणि बसला 79 धावांचा फटका, प्रसिद्धच्या षटकात झालं असं की..
RCB vs GT: गुजरातला दोन चुका भोवल्या आणि बसला 79 धावांचा फटका, प्रसिद्धच्या षटकात झालं असं की..Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 26, 2026 | 9:46 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेतील क्वॉलिफायर 1 सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर गुजरात टायटन्सने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पण हा निर्णय चुकला असंच वाटतं. पहिल्या डावात फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 20 षटकात 5 गडी गमवून 254 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करणं धर्मशाळेतील मैदानात सोपं नाही. कारण आतापर्यंत 210च्या वर झालेली धावसंख्या येथे गाठता आलेली नाही. त्यामुळे आरसीबीने अर्धी लढाई जिंकली आहे. दुसरीकडे, या धावसंख्येत 79 धावांचा फटका बसला आहे. आता हा फटका कसा बसला तर झेल सोडल्याने… रजत पाटीदार 14 धावांवर खेळत असताना पहिल्यांदा त्याचा झेल पकडता आला नाही. त्यानंतर 18 धावांवर असताना जीवदान मिळालं. असे दोन जीवदाने एकाच षटकात मिळाले आणि त्याच्या त्याने पुरेपूर फायदा घेतला.

रजत पाटीदार 10 चेंडूत 14 धावांवर खेळत होता. आरसीबीच्या 13 षटकात 3 गडी गमवून 128 धावा केल्या होत्या. 14वं षटक टाकण्यासाठी प्रसिद्ध कृष्णा आला आणि स्ट्राईकल रजत पाटिदार होता. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर फटका मारताना रजत पाटिदार चुकला आणि चेंडू वर उडला. यष्टीरक्षक जोस बटलरच्या डोक्यावरून उंच उडाला. त्यावेळी होल्डर थर्ड मॅनकडू धावत आला आणि जोस बटलरही धावला. पण चेंडू या दोघांच्या मधे पडला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर पाटीदारने चौकार मारला. त्याच्या पुढच्या चेंडूवर पुन्हा प्रसिद्धने आखुड टप्प्याच्या चेंडू टाकला. या चेंडूवर पाटीदारने पुल मारला पण चेंडू पुन्हा वर चढला. या झेलखाली कागिसो रबाडा आला होता. पण त्याला काही झेल पकडता आला नाही. त्यामुळे रजत पाटीदाराला एकाच षटकात दोन जीवदान मिळाले आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला.

रजत पाटीदारने 33 चेंडूत 9 षटकार आणि 5 चौकार मारत नाबाद 93 धावांची खेळी केली. त्याने 283.82 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या. खरं तर रजत पाटीदारचा झेल पकडला असता तर कदाचित चित्र वेगळं असतं. पण ही चूक धावांच्या रुपाने बसली. त्यामुळे आरसीबीवर दबाव वाढवता आला नाही.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी