AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RCB vs GT, IPL 2026 Final : विराटची चाबूक खेळी, आरसीबी सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन, गुजरातचा फायनलमध्ये धुव्वा

Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans, IPL 2026 Final Match Result : गतविजेता आरसीबी आपली ट्रॉफी कायम राखण्यात यशस्वी ठरली आहे. तर गुजरात टायटन्स टीमला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम या घरच्या मैदानात आयपीएल ट्रॉफी जिंकण्यात अपयश आलं आहे.

RCB vs GT, IPL 2026 Final : विराटची चाबूक खेळी, आरसीबी सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन, गुजरातचा फायनलमध्ये धुव्वा
Virat Kohli Fifty IPL 2026 FinalImage Credit source: IPL X Account
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jun 01, 2026 | 1:28 AM
Share

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने इतिहास घडवला आहे. आरसीबी आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील चॅम्पियन टीम ठरली आहे. आरसीबीने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होम टीम गुजरात टायटन्सवर 5 विकेट्सने मात करत आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. गुजरातने वॉशिंग्टन सुंदर याच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर आरसीबीसमोर 156 धावांचं आव्हान ठेवलं होतं. आरसीबीने हे आव्हान 12 बॉलआधी 5 विकेट्स राखून पूर्ण केलं. आरसीबीने 18 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 161 धावा केल्या आणि सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली. विराट कोहली आरसीबीच्या विजयाचा हिरो ठरला. विराटने बॅटिंगने आरसीबीच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. विराटने नाबाद 75 धावांची खेळी केली. तर इतरांनीही बॅटिंग आणि बॉलिंगसह योगदान दिलं. तर गुजरातला पराभवामुळे उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं आहे.

आरसीबीची बॅटिंग

इम्पॅक्ट प्लेअर वेंकटेश अय्यर आणि विराट या सलामी जोडीने आरसीबीला वेगवान सुरुवात करुन दिली. विराट-वेंकटेशने 4.3 ओव्हरमध्ये 62 धावा जोडल्या. गुजरातने त्यानंतर आरसीबीला सलग 2 ओव्हरमध्ये झटके दिले. वेंकटेशच्या रुपात आरसीबीने पहिली विकेट गमावली. वेंकटेशने 16 बॉलमध्ये 32 रन्स केल्या. त्यानंतर देवदत्त पडीक्कल याने 1 धाव करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला.

राशीद खानची करामत

त्यानतंर राशीदने आरसीबीला नवव्या ओव्हरमध्ये 2 झटके दिले. राशीदने कॅप्टन रजत पाटीदार 11 आणि कृणाल पंड्या याला 1 रनवर आऊट केलं. मात्र त्यानंतर टीम डेव्हिड याने विराटला चांगली साथ दिली. विराट आणि टीमने पाचव्या विकेटसाठी 31 बॉलमध्ये 41 रन्स केल्या. टीमने 24 धावांचं योगदान दिलं. तर विराट आणि जितेश शर्मा या दोघांनी 29 धावांची भागीदारी करुन आरसीबीला विजयी केलं. जितेशने नॉट आऊट 11 रन्स केल्या. तर विराटने सर्वाधिक योगदान दिलं. विराटने 42 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 9 फोरसह नॉट आऊट 75 रन्स केल्या. तर गुजरातसाठी राशिद खान व्यतिरिक्त अर्शद खान, मोहम्मद सिराज आणि कगिसो रबाडा या त्रिकुटाने प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

पहिल्या डावात काय झालं?

गुजरात टॉस गमावून बॅटिंगसाठी आली. मात्र गुजरातसाठी वॉशिंग्टन सुंदर याचा अपवाद वगळता इतरांना काही खास करता आलं नाही. साई सुदर्शन आणि कॅप्टन शुबमन गिल या दोघांनी निराशा केली. आरसीबीच्या गोलंदाजांनी या दोघांना झटपट आऊट करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. गुजरातसाठी निशांत सिंधू याने 20 धावा केल्या. तर वॉशिंग्टन सुंदर याने सर्वाधिक आणि नाबाद 50 धावा केल्या. सुंदरच्या या खेळीमुळे गुजरातला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 155 रन्स करता आल्या. आरसीबीसाठी रसीख सलाम डार याने तिघांना आऊट केलं. जोश हेझलवूड आणि भुवनेश्वर कुमार या दोघांनी 1 विकेट मिळवली. तर कृणालने 1 विकेट मिळवून योगदान दिलं.

स्कोअरकार्ड

आरसीबी पंरपरा कायम राखण्यात यशस्वी

आरसीबीने गुजरात विरूद्धच्या अंतिम सामन्यातील विजयासह गेल्या 8 वर्षांपासूनची परंपरा कायम राखण्यात यश मिळवलं आहे. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात 2018 पासून क्वालिफायर 1 जिंकणारी टीमच चॅम्पियन राहिली आहे. आरसीबी यंदा ही परंपरा कायम राखण्यात यशस्वी ठरणार की नाही? याकडे चाहत्यांचं लक्ष होतं. मात्र आरसीबीने ही परंपरा कायम राखलीय. आरसीबीने क्वालिफायर 1 सामन्यात गुजरातला पराभूत करुन फायनलमध्ये धडक दिली होती.

आरसीबी एकूण चौथी टीम

दरम्यान आरसीबीने या विजयासह एक खास कामगिरी करुन दाखवली आहे. आरसीबी आयपीएल स्पर्धेत 2 ट्रॉफी जिंकणारी चौथी टीम ठरली आहे. आरसीबीआधी चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या 3 संघांनी 2 वेळा ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली आहे. तसेच आरसीबी चेन्नई आणि मुंबईनंतर सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकणारी तिसरी टीम ठरली आहे.

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!