AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026, RR vs GT : नाणेफेकीचा कौल राजस्थान रॉयल्सच्या बाजूने, ट्रेंड मोडत रियान परागचा मोठा निर्णय

आयपीएल 2026 स्पर्धेतील नवव्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स हे संघ आमनेसामने आले आहेत. नाणेफेकीचा कौल हा राजस्थान रॉयल्सच्या बाजूने लागला. पण कर्णधार रियान परागने घेतलेल्या निर्णयाने सर्वच आवाक् झाले.

IPL 2026, RR vs GT : नाणेफेकीचा कौल राजस्थान रॉयल्सच्या बाजूने, ट्रेंड मोडत रियान परागचा मोठा निर्णय
IPL 2026, RR vs GT : नाणेफेकीचा कौल राजस्थान रॉयल्सच्या बाजूने, ट्रेंड मोडत रियान परागचा मोठा निर्णय Image Credit source: Rajasthan Royals Twitter
| Updated on: Apr 04, 2026 | 7:55 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेतील मागच्या 8 सामन्यापासून सुरू असलेला ट्रेंड अखेर रियान परागने मोडीत काढला आहे. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रत्येक संघ प्रथम गोलंदाजीला प्राधान्य देत होता. पण राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्यात वेगळं चित्र पाहायला मिळालं. नाणेफेकीचा कौल हा राजस्थान रॉयल्सच्या बाजूने लागला. यावेळी रियान पराग प्रथम गोलंदाजी घेईल असं वाटलं होतं. पण तसं झालं नाही. रियान परागने प्रथम फलंदाजीला प्राधान्य दिलं. नाणेफेक जिंकल्यानंतर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग म्हणाला की, ‘आम्ही प्रथम फलंदाजी करणार आहोत. आम्हाला वेगवेगळ्या परिस्थितींचा अंदाज घेऊन त्यानुसार जुळवून घ्यावे लागेल. आशा आहे की आम्ही 210 च्या आसपास एक चांगली धावसंख्या उभारू आणि नंतर तिचा बचाव करू. मला असा संघ हवा आहे जो सर्व प्रकारच्या परिस्थितीत खेळू शकेल. दोन बदल केले आहेत. ब्रिजेशच्या जागी तुषार देशपांडे आणि बिश्नोईच्या जागी शुभम दुबे संघात आले आहेत.’

राशीद खान काय म्हणाला?

गुजरात टायटन्सचा कर्णधार रशीद खान म्हणाला की, ‘आम्हाला प्रथम गोलंदाजी करायची होती. गिलला स्नायूंचा त्रास होत आहे , आशा आहे की तो लवकरच परत येईल. कुमार कुशाग्र त्याचा पहिला सामना खेळत आहे आणि त्याला खेळताना पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. आम्ही मागच्या सामन्यातही चांगला क्रिकेट खेळलो. तो एक चांगला सामना होता. आम्हाला येथे आमचे 100% देण्याची गरज आहे. त्यामुळे मला वाटतं की आम्ही मागील सामन्यातही खूप चांगली कामगिरी केली, पण आम्ही त्यातून सकारात्मक गोष्टी घेतो आणि आमच्या खेळातील कौशल्ये सुधारत राहतो.’

दोन्ही संघांची प्लेइंग 11

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): कुमार कुशाग्रा, साई सुधरसन, जोस बटलर (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, रशीद खान (कर्णधार), कागिसो रबाडा, अशोक शर्मा, मोहम्मद सिराज, प्रसीद्ध कृष्णा

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल, रियान पराग (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, डोनोवन फरेरा, रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, तुषार देशपांडे, संदीप शर्मा

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा