SRH vs PBKS : हैदराबादचा घरच्या मैदानात मोठा विजय, पंजाबचा 33 धावांनी धुव्वा

Sunrisers Hyderabad vs Punjab Kings Match Result, IPL 2026 : सनरायजर्स हैदराबादने पंजाब किंग्सवर मात करत 2 गुणांची कमाई केली. हैदराबादचा हा 19 व्या मोसमातील एकूण सातवा विजय ठरला.

SRH vs PBKS : हैदराबादचा घरच्या मैदानात मोठा विजय, पंजाबचा 33 धावांनी धुव्वा
Ishan Kishan Sunrisers Hyderabad IPL 2026
Image Credit source: PTI
| Updated on: May 07, 2026 | 7:34 AM

सनरायजर्स हैदराबादने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 49 व्या सामन्यात पंजाब किंग्सचा मोठ्या फरकाने धुव्वा उडवला आहे. हैदराबादने इशान किशन आणि हेन्रिक क्लासेन या दोघांनी केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पंजाबसमोर 236 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पंजाबने या धावांचा पाठलाग करताना जोरदार संघर्ष केला. मात्र पंजाबला आसपासही पोहचता आलं नाही. कूपर कोनोली याने केलेल्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर पंजाबला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 202 धावाच करता आल्या. पंजाबने अशाप्रकारे 33 धावांनी हा सामना जिंकला आणि 2 गुणांची कमाई केली. तर कूपरचं नाबाद शतक व्यर्थ ठरलं.

पंजाबने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला. हैदराबादने बॅटिंगच्या संधीचा फायदा घेत मोठा फायदा उचलला. हैदराबाद टीमने घरच्या मैदानात अर्थात राजीव गांधी स्टेडियममध्ये 4 विकेट्स गमावून 235 धावा जोडल्या. हैदराबादच्या बॅटिंग केलेल्या पाचही फलंदाजांनी जबरदस्त खेळी केली. हैदराबादसाठी हेन्रिक क्लासेन याने सर्वाधिक 69 धावा केल्या. इशान किशन याने 55 धावांचं योगदान दिलं. ट्रॅव्हिस हेड याने 38, अभिषेक शर्मा याने 35 तर नितीश कुमार रेड्डी याने नाबाद 29 धावांचं योगदान दिलं. तर पंजाबसाठी अर्शदीप सिंह, लॉकी फर्ग्यूसन, युझवेंद्र चह आणि विजयकुमार वैशाख या चौघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

पंजाबची बॅटिंग

पंजाबची विजयी धावांचा पाठलाग करताना खराब सुरुवात झाली. हैदराबादने पंजाबला सलग 2 झटके दिले. प्रियांश आर्या 1 आणि प्रभसिमरन सिंह 3 धावा करुन माघारी परतला. त्यामुळे पंजाबची 2 आऊट 4 अशी स्थिती झाली. त्यानंतर तिसऱ्या स्थानी आलेल्या कूपर कॉनोली याने इतर फलंदाजांसह भागीदारी करुन पंजाबला विजयापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला या प्रयत्नात दुसऱ्या बाजूने अपेक्षित साथ मिळाली नाही.

स्कोअरकार्ड

कूपरचा शतकी संघर्ष वाया

पंजाबकडून कूपरचा अपवाद वगळता फक्त तिघांनाच दुहेरी आकडा गाठता आला. मार्कस स्टॉयनिस याने 28, सूर्यांश शेडगे याने 25 तर मार्को यान्सेन याने 19 धावा केल्या. तर कूपरने सर्वाधिक आणि नाबाद धावा केल्या. कूपरने 59 बॉलमध्ये नॉट आऊट 107 रन्स केल्या. कूपरने 8 सिक्स आणि आणि 7 फोर लगावले. तर हैदराबादसाठी एकूण 6 पैकी 5 जणांनी विकेट मिळवल्या. हैदराबादसाठी कॅप्टन पॅट कमिन्स आणि शिवांग कुमार या दोघांनी प्रत्येकी 2-2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर नितीश कुमार रेड्डी, एशान मलिंगा आणि शाकीब हुसैन या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली. हैदराबादने अशाप्रकारे विजय मिळवला.

Follow Us