AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा हाहाकार, 48 तास अतिधोक्याची, थेट 63..

राज्यात पावसाने पाठ फिरवली आहे. राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला. मात्र, दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्ये पावसाने थैमान घातले. तूफान पाऊस उत्तर प्रदेशमध्ये असून भारतीय हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला.

उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा हाहाकार, 48 तास अतिधोक्याची, थेट 63..
Uttar Pradesh Rain
| Updated on: Sep 27, 2026 | 11:00 AM
Share

राज्यात पावसाने पाठ फिरवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळाची घोषणा केली. राज्यात स्थिती भीषण आहे. पाऊस नसल्याने पिके हातून गेली आहे. त्यातच आता उत्तर प्रदेशात पावसाने धुमाकूळ घातला. उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनने रौद्ररूप धारण केले असून गेल्या 48 तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये तब्बल 15 जणांचा जीव गेला. असून 5 जण गंभीर जखमी झाले आहेत, तर 117 कच्ची घरे कोसळली आहेत. राज्यातील 63 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कित्येक पटीने जास्त पावसाची नोंद झाली आहे. राजधानी लखनऊसह कानपूर, फरुखाबाद आणि पूर्वांचलमधील अनेक जिल्ह्यांत जलमय परिस्थिती निर्माण झाली असून रस्ते व शेती पुराच्या पाण्याखाली गेली आहे. हवामान खात्याने 27 सप्टेंबर रोजीही अनेक जिल्ह्यांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

उत्तर प्रदेशात मुसळधार पावसामुळे 48 तासांत 15 जणांचा जीव गेला असून 117 घरे बाधित झाली आहेत. लखीमपूर खेरीमध्ये सर्वाधिक 4 तर अयोध्या, अमेठी, बहराइच आणि कानपूरसह इतर जिल्ह्यांत प्रत्येकी 1 जणाचा बळी गेला आहे. उत्तर प्रदेशातील 63 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा प्रचंड जास्त पाऊस नोंदवला गेला असून कानपूर आणि फरुखाबादमध्ये पावसाने सर्व विक्रम मोडले आहेत.

पावसामुळे शेतातील पिके आडवी झाली असून राजधानी लखनऊसह सखल भाग आणि महामार्ग पाण्याखाली गेले आहेत. हवामान विभागाने पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज वर्तवत 8 जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट’तर 13 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. उत्तर प्रदेशमध्ये पावसाने थैमान घातला. लोकांचे जनजीवन या पावसामुळे विस्कळीत झाले.

अमरावती जिल्ह्यातील 14 ही तालुक्यात दुष्काळ जाहीर झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनाम्याचे आदेश दिली आहेत. अमरावती जिल्ह्यात त्रीस्तरीय समिती करणार पंचनामे. या समितीमध्ये तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवक यांचा समावेश असून ते गाव पातळीवर करणार पंचनामे करत आहेत. यामध्ये प्रत्येक गावातील पाच प्लॉटमधील नुकसान मोजण्यात येऊन त्याची सरासरी काढण्यात येईल व नुकसानीचे प्रमाण ठरवण्यात येणार आहे.

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!