AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या बैठकीवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आता…

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या बैठकीवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी आयोग सारवासावर करत असल्याचे सांगत ज्ञानेश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या बैठकीवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आता...
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 27, 2026 | 10:49 AM
Share

संपूर्ण देशभरातून केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात वातावरण तापलं आहे. ज्ञानेश कुमार हे आयोगात मनमानी पद्धतीने कारभार करत असल्याचा आरोप आहे. दोन निवडणूक आयुक्तांनीच आरोप केल्याने खळबळ उडाली होती. परंतु काल तिन्ही निवडणूक आयोगाची बैठक झाली. या बैठकीत एसआयआर बाबत महत्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगात सर्वकाही सुरळीत सुरू असल्याची चर्चा झाली. निवडणूक आयोगाच्या या बैठकीवरून संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. देशाचे दुश्मन हे ज्ञानेश कुमार आहेत. आता ते सारवासारवत करत आहे, अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला.

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. संजय राऊत म्हणाले, ‘ज्ञानेश कुमार हे लोकशाही विरोधात मोदी-शहा यांच्या इशाऱ्याने कार्यक्रम राबवत आहेत. दोन निवडणूक आयुक्तांनी बंड केलं. त्यांना एक्सपोज केलं आहे. भाजपला मदत होईल, लाभ होईल, असे निर्णय मुख्य निवडणूक आयुक्त घेतात, ही लोकशाहीची हत्या आहे. स्वातंत्र्याची गळचेपी आहे. 13 कोटी मतदारांची नावे बेकायदेशीरपणे वगळली आहे. महाराष्ट्रात 2 कोटी नावे वगळली आहेत. दिल्ली, पश्चिम बंगालमध्ये प्रत्येक राज्यात भाजपला मदत होईल, अशी भूमिका घेतली, ती घातक आहे. याविरोधात संतापाचं वातावरण आहे. जंतरमंतरवर आंदोलन सुरू झालं आहे. कॉक्रोच जनता पार्टीने त्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. हे खरं असले तरी, काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर 4 तारखेला स्वतंत्र मोर्चा काढून महाराष्ट्राची ताकद, रोष दाखवावा, यावर निर्णय झाला. अभिजीत दिपकेंच्या आंदोलनाला देखील शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे. तो अराजकीय कार्यक्रम आहे. त्यांना पहिल्यापासून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचा पाठिंबा आहे. पण राजकीय ताकद जी आहे, कारण कॉक्रोच जनता पक्ष हा राजकीय पक्ष नाही. यात खरंतर राजकीय पक्षांचं नुकसान झालं आहे’.

‘मनसे, शिवसेनेसह महाराष्ट्रातील तमाम राजकीय पक्षांना आवाहन करण्यात येत आहे की, वेगवेगळे मोर्चे काढण्यापेक्षा एकत्र मोर्चा काढुयात. त्याची तयारी सुरू झाली आहे. भारताच्या इतिहासातील प्रचंड मोठा मोर्चा होणार आहे. हा मोर्चा जगाला पाहता येईल. इतर पक्षांसोबत आजपासून चर्चा करू. हा सगळ्यांचा विषय आहे. राहुल गांधी यांनीही पत्रकार परिषद घेत आहे. याविषयी सातत्याने उद्धव ठाकरे, राज ठाकरे, ममता बॅनर्जी भाष्य करत आहेत. महाराष्ट्रात सर्वांनी एकत्र यावं, यासाठी दोन्ही भाऊ प्रयत्न करत आहेत. या संस्था मोदी शहांचे घरघडी आहेत. त्यांच्या घरी भांडी घासतात. धुणीभांडी करतात. खास करून ज्ञानेश कुमार असतील. सुप्रीम कोर्टातील काही न्यायाधीश असतील. एका दबावाखाली मोदी-शहांना हवं, त्यासाठी लोकशाहीची हत्या करून निर्णय देत आहेत. त्यातील देशाचा दुश्मन हे ज्ञानेश कुमार आहेत, असे पुढे म्हणाले. निवडणूक आयोगाच्या बैठकीवर संजय राऊत म्हणाले, ‘आता ते सारवासारवत करत आहेत. आम्ही कोर्टातही एसआयआरविषयी याचिका केल्या. परंतु त्या फेटाळण्यात आल्या. सुप्रीम कोर्टही दबावाखाली आहे. देशात वातावरण निर्माण होत आहे. सुप्रीम कोर्टाला निर्णय घ्यावा लागेल’.

‘निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला जागा दिल्या असत्या, तर त्याचा फायदा ममता बॅनर्जी यांना झाला असता. दिल्लीतील सैतानाला मारण्याची वेळ आली आहे. सैतानाला मारण्यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. आयोगाविरोधात डाव्या पक्षांनी देखील सहकार्य करावं, अशी भूमिका ममता बॅनर्जी यांनी केली आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.

Follow Us
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...