IPL 2026 Trade : रवींद्र जडेजा राजस्थान रॉयल्समध्ये, पण बसला 4 कोटींचा फटका; सॅमसनला मिळाले इतके पैसे

आयपीएल 2025 स्पर्धेतील रिटेन्शन यादी जाहीर होण्यापूर्वी ट्रेड केलेल्या खेळाडूंची नावं समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेली असलेली संजू सॅमसन आणि रवींद्र जडेजा यांच्यातील ट्रेड यशस्वी झाली आहे. चला जाणून घेऊयात किती पैसे मिळाले ते..

IPL 2026 Trade : रवींद्र जडेजा राजस्थान रॉयल्समध्ये, पण बसला 4 कोटींचा फटका; सॅमसनला मिळाले इतके पैसे
IPL 2026 Trade : रवीद्र जडेजा राजस्थान रॉयल्समध्ये, पण बसला 4 कोटींचा फटका; सॅमसनला मिळाले इतके पैसे
Image Credit source: IPL Twitter
| Updated on: Nov 15, 2025 | 3:55 PM

आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी फ्रेंचायझींमध्ये उलथापालथ होताना दिसत आहे. आवडत्या आणि आवश्यक असलेल्या खेळाडूंसाठी ट्रेड विंडोच्या माध्यमातून बोली लावली जात आहे. राजस्थान रॉयल्सची चेन्नई सुपर किंग्सबरोबरची डील पक्की झाली आहे. आयपीएल 2026 स्पर्धेत रवींद्र जडेजा राजस्थान रॉयल्सकडून खेळताना दिसणार आहे. तर संजू सॅमसनला चेन्नई सुपर किंग्सने ट्रेड केलं आहे. या ट्रेडमध्ये संजू सॅमसनचं काही नुकसान झालं नाही. पण रवींद्र जडेजाला मात्र 4 कोटींचा फटका बसला आहे. कारण राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात डील झाल्यानंतर आता मिळत असलेल्या पैशांच्या तुलनेत त्याला कमी पैसे मिळणार आहेत. चला जाणून घेऊयात संपूर्ण माहिती…

आयपीएल स्पर्धेत रवींद्र जडेजा 12 पर्व चेन्नई सुपर किंग्सकडून खेळला. पण आता राजस्थान रॉयल्समध्ये त्याचं कमबॅक झालं आहे. यासाठी राजस्थान रॉयल्सने जडेजाच्या बदल्यात संजू सॅमसनला चेन्नईकडे सोपवलं आहे. रवींद्र जडेजाला राजस्थान रॉयल्सकडून 14 कोटी मिळणार आहेत. तर चेन्नई सुपर किंग्स त्याला एका पर्वासाठी 18 कोटी देत होती. म्हणजेच राजस्थान रॉयल्सकडे जाताना 4 कोटींचा फटका बसला आहे. दुसरीकडे, संजू सॅमसनचं काहीच नुकसान झालेलं नाही. त्याला चेन्नई सुपर किंग्सकडून 18 कोटी रुपये मिळणार आहेत. यापूर्वीही राजस्थानकडून त्याला 18 कोटी मिळत होते.

दरम्यान, इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करन आता चेन्नई सुपर किंग्सऐवजी राजस्थान रॉयल्सकडून खेळणार आहे. मागच्या पर्वाप्रमाणे त्याला राजस्थानकडून 2.4 कोटी मिळणार आहेत. तर मोहम्मद शमी सनरायझर्स हैदराबादकडून लखनौ सुपर जायंट्स संघात सामील झाला आहे. लखनौकडून त्याला 10 कोटी मिळणार आहे. अर्जुन तेंडुलकरही मुंबई इंडियन्स ऐवजी लखनौ सुपर जायंट्सकडून खेळणार आहे. मागच्या पर्वात त्याला 30 लाख मिळाले होते आताही तितकेच मिळणार आहेत.

नितीश राणाला राजस्थान रॉयल्सने सोडलं असून तो आता दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार आहे. त्याला 4.2 कोटी मिळणार आहेत. फिरकीपटू मयंक मार्कण्डेय केकेआरमधून मुंबई संघात सहभागी झाला आहे. दिल्लीकडून डोनोवन फरेराला राजस्थान रॉयल्सने घेतलं आहे. आता रिटेन्शन यादीत फ्रेंचायझींनी कोणाला रिलीज केलं आहे आणि कोणासाठी मिनी लिलावात बोली लागणार याची उत्सुकता आहे.