IPL 2026: जेतेपदानंतर विराट कोहलीला आरसीबीची जर्सी काढावी लागली, ड्रेसिंग रूममध्ये झालं असं की… Video
Virat Kohli RCB Dressing Room Video: आयपीएल 2026 स्पर्धेच्या जेतेपदावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नाव कोरलं आहे. सलग दोन वेळा जेतेपद जिंकून एक विक्रमही रचला आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सनंतर अशी कामगिरी करणारा तिसरा संघ ठरला. या जेतेपदानंतर आरसीबीच्या ड्रेसिंग रूममध्ये काय घडलं?

Virat Kohli RCB Dressing Room Video: आयपीएल 2026 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चॅम्पियनसारखी कामगिरी केली. गतविजेत्या आरसीबीने यंदाही जेतेपद कायम राखलं. या ऐतिहासिक विजयानंतर आरसीबीच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. असं असताना आरसीबीने सोमवारी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत प्रशिक्षक अँडी फ्लॉवर विराट कोहलीचं कौतुक करताना दिसत आहे. इतकंच काय तर विराट कोहली ड्रेसिंग रूमममध्ये संघाची जर्सी काढताना दिसला. त्याने लाल रंगाची जर्सी परिधान केली होती. त्या मागे खास कारण होतं. यामुळे आरसीबीच्या जेतेपदाच्या जल्लोषाला आणखी चार चाँद लागले. आरसीबीने जेतेपद मिळवलं आणि संपूर्ण संघ ड्रेसिंग रूममध्ये पोहोचला. तेव्हा त्यांच्यासाठी एक खास सरप्राइट तयार होता.
आरसीबी व्यवस्थापनाने जेतेपदानंतर संघासाठी एक चॅम्पियन जर्सी तयार केली होती. त्यामुळे संघ ड्रेसिंग रूममध्ये पोहोचताच सर्वांनी सामन्याची जर्सी काढली आणि नवी चॅम्पियन जर्सी घातली आणि विजयाचा जल्लोष केला. या दरम्यान, मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी विराट कोहलीचं कौतुक केलं. विराट कोहलीची मैदानातील जिद्द ही ड्रेसिंग रूमसाठी सर्वात मोठी प्रेरणा असल्याचे त्यांना सांगितलं. त्यामुळेच विजय सोपा झाल्याचा उल्लेख केला. अँडी फ्लॉवर म्हणाले की, “विराट, मला याची पूर्ण जाणीव आहे की तुझ्याकडे खूप लक्ष दिले जाते आणि ते योग्यच आहे. पण मला त्याचे महत्त्व अजिबात कमी करायचे नाही, कारण तू या ड्रेसिंग रूमचे हृदय आहेस.”
VIRAT KOHLI WEARING RCB SPECIAL CHAMPION JERSEY 🥶 pic.twitter.com/CIWItd9m5E
— Johns. (@CricCrazyJohns) June 4, 2025
“𝘠𝘰𝘶 𝘢𝘳𝘦 𝘢 𝘩𝘦𝘢𝘳𝘵𝘣𝘦𝘢𝘵 𝘪𝘯 𝘵𝘩𝘪𝘴 𝘥𝘳𝘦𝘴𝘴𝘪𝘯𝘨 𝘳𝘰𝘰𝘮”: Andy Flower to Virat Kohli ❤️
Coach Andy uncut. From highlighting top performances, to wishing the young guns. Here’s a special from Andy’s dressing room talk. 🎥😇🤩
Thank you, Coach! 🫡
To be… pic.twitter.com/QHGI6xCmLP
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) June 1, 2026
अँडी फ्लॉवर आरसीबी संघासोबत 2024 पासून आहेत. त्याने टीमचे हेड कोच माइक हेसन यांची जागा घेतली. आयपीएल 2024 मध्ये अँडी फ्लॉवर यांच्या मार्गदर्शनामुळे संघ प्लेऑफपर्यंत पोहोचला होता. त्यानंतर आयपीएल 2025 मध्ये जेतेपदाला गवसणी घातली. इतकंच काय यंदा जेतेपद राखण्याचं आव्हान होतं. त्यातही आरसीबी संघाला यश आलं आणि सलग दुसऱ्यांदा जेतेपद मिळवलं. अँडी फ्लॉवर यांच्या मार्गदर्शनामुळेच आरसीबी चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्सनंतर सलग दोनदा आयपीएल ट्रॉफी जिंकणारा तिसरा संघ ठरला आहे.