IPL 2027 च्या रिटेंशनमध्ये मुंबईचे ४ दिग्गज खेळाडू रिलीज होऊ शकतात; MI मोठा निर्णय घेणार का? 10 संघांतील ‘या’ स्टार खेळाडूंच्या नावांची चर्चा
IPL 2027 Retention Speculation: आयपीएलच्या रिटेंशनमध्ये मोठा फेरबदल होणार आहे. 10 संघांतील स्टार खेळाडूंवर रिलीज होण्याची टांगती तलवार आहे. यात अनेक दिग्गजांचा समावेश आहे.

IPL 2027 च्या हंगामाआधी खेळाडूंच्या रिटेंशन आणि रिलीजबाबत चर्चांना वेग आला आहे. आगामी लिलावापूर्वी फ्रँचायझी आपल्या संघातील कोणत्या खेळाडूंना कायम ठेवणार आणि कोणाला रिलीज करणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. पण १० संघातील काही खेळाडूंवर टांगती तलवार असल्याचे समोर आले आहे. संभाव्य यादीत मुंबई इंडियन्सपासून चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्सपर्यंत अनेक संघांतील मोठ्या नावांचा समावेश आहे.
ही यादी संभाव्यतेवर आधारित आहे. संबंधित संघांनी या खेळाडूंना रिलीज करण्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. मुंबई इंडियन्सच्या संभाव्य रिलीज यादीत हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट आणि क्विंटन डी कॉक यांची नावे चर्चेत आहेत. यापैकी हार्दिक आणि सूर्यकुमारसारख्या प्रमुख खेळाडूंच्या नावांचा समावेश असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
चेन्नई सुपर किंग्सकडून सरफराज खान, शिवम दुबे आणि खलील अहमद यांना रिलीज केले जाऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संभाव्य यादीत जितेश शर्मा आणि रोमारियो शेफर्ड यांची नावे आहेत. दिल्ली कॅपिटल्सच्या यादीत कुलदीप यादव, टी. नटराजन, मिचेल स्टार्क आणि करुण नायर यांचा समावेश आहे.
राजस्थान रॉयल्सकडून यशस्वी जैस्वाल, सॅम करन, शिमरॉन हेटमायर आणि रवी बिश्नोई यांच्या नावांची चर्चा आहे. कोलकाता नाइट रायडर्सच्या संभाव्य यादीत अजिंक्य रहाणे, कॅमेरून ग्रीन, रोव्हमन पॉवेल, ब्लेसिंग मुजारबानी आणि नवदीप सैनी यांचा समावेश आहे. पंजाब किंग्सकडून मार्को यान्सन, नेहल वढेरा, मार्कस स्टॉयनिस आणि मिचेल ओवेन यांची नावे चर्चेत आहेत.
गुजरात टायटन्सच्या यादीत शाहरुख खान, गुरनूर ब्रार, साई किशोर आणि राहुल तेवतिया यांचा समावेश आहे. लखनौ सुपर जायंट्सकडून दिग्वेश राठी, अन्रिच नॉर्टजे, आवेश खान आणि अब्दुल समद यांना रिलीज केले जाऊ शकते, असा अंदाज आहे. सनरायझर्स हैदराबादच्या संभाव्य यादीत पॅट कमिन्स, झीशान अन्सारी, हर्षल पटेल, जयदेव उनाडकट आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांची नावे आहेत.