AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेल्वे कर्मचारी स्पेशल लोकलची व्हीआयपी संस्कृती बंद करा, मनसे नेते अविनाश जाधव यांची मागणी

रेल्वेच्या अधिकारी दिल्लीत बसून निर्णय घेत असतात. त्यांना मुंबई आणि महाराष्ट्र केवळ कमाई करण्यासाठी हवा आणि प्रवाशांना सेवा देण्यासाठी नाही. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांची व्हीआयपी लोकल बंद करावी अशी मागणी मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केली आहे.

रेल्वे कर्मचारी स्पेशल लोकलची व्हीआयपी संस्कृती बंद करा, मनसे नेते अविनाश जाधव यांची मागणी
avinash jadhav and central railway services disrupted
| Updated on: Oct 26, 2026 | 8:01 PM
Share

मध्य रेल्वेच्या लोकलची सेवा सोमवारी सकाळी लागोपाठ घडलेल्या दोन तांत्रिक बिघाडाने दिवसभर आणि रात्री विस्कळीत झाली होती. सायंकाळी उशीरा ठाणे स्थानकात प्रचंड गर्दी झाल्याने चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी लोकलमध्ये चढायला मिळत नव्हते. अशा वेळी मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यासाठीची स्पेशल ट्रेन ठाण्यात आली. त्या लोकलमध्ये अजिबात गर्दी नसल्याने प्रवाशांनी या लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी आतील मुजोर रेल्वे कर्मचाऱ्यांनी आतून दरवाजे बंद केल्याची घटना घडली आहे. या घटनेवरुन आता मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी रेल्वेला इशारा दिला आहे.

मध्य रेल्वेच्या कांजूरमार्ग आणि भांडुप – मुलुंड स्थानकात अनुक्रम सिग्नल यंत्रणेला आग लागणे आणि ओव्हरहेड वायरवर वायरीचा तुकडा पडल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली. या दोन एकामोगामागच्या बिघाडाने मध्य रेल्वेच्या सेवेचा पुरता बोजवारा उडाला. या गोंधळाचा सायंकाळी कामावरुन घरी परतणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही फटका बसला. या गोंधळाने सायंकाळी गर्दीच्या वेळी प्रवाशांची कोंडी झाली. यावेळी सायंकाळी ठाणे रेल्वे स्थानकात प्रचंड गर्दी झाली. त्यावेळी मध्य रेल्वेच्या प्रवाशांची स्पेशल लोकल आली. ही लोकल ९० टक्के रिकामी होती. त्यामुळे प्रवाशांनी त्यात चढण्याचा प्रयत्न केला तर मुजोर रेल्वे कर्मचाऱ्यांनी आतून दरवाजा बंद केला. त्यामुळे संतापलेल्या प्रवाशांनी आपल्या बाटलीतील पाणी या लोकलच्या दरवाजावर फेकल्याची घटना घडली.

या संदर्भात मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की ठाणे आणि त्यापुढील पट्ट्यात मोठ्या प्रमाणात लोकसंख्येत वाढ झाली आहे. ९० लाख लोक या भागातून प्रवास करत असतात. आज मध्य रेल्वेच्या या तांत्रिक गोंधळाने एका तरुणाचा मृत्यूही झाला आहे. त्यामुळे अशाप्रकारे सर्वसामान्य प्रवाशांना सेवा देताना प्रशासनाला जमत नसेल तर त्यांनी अशा प्रकारची व्हीआयपी संस्कृती बंद केली पाहिजे. रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना मिळणारा पगार हा सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांच्या तिकीटातून मिळत असतो. रेल्वेचे अधिकारी दिल्लीत बसून धोरण ठरवतात. त्यांना ग्राऊंड परिस्थिती काहीही माहिती नसते. त्यामुळे त्यांनी अशी व्हिआयपी ट्रीटमेंट सर्वसामान्य प्रवाशांना द्यावी अशी अपेक्षा आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांची ही व्हीआयपी ट्रीटमेंट बंद करावी अशीही मागणी अविनाश जाधव यांनी केली आहे.

Follow Us
मुंबई लोकलचा खोळंबा कायम! 10 तासांनंतरही... दादर-सीएसएमटी स्थानकांवर
मुंबई लोकलचा खोळंबा कायम! 10 तासांनंतरही... दादर-सीएसएमटी स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी
शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा! मायक्रो फायनान्स कंपन्यांनाबाबत ओमराजे...
शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा! मायक्रो फायनान्स कंपन्यांनाबाबत ओमराजे निंबाळकरांचा मोठा इशारा
CSMT वर रेल्वेचा खोळंबा! लोकलसह बाहेरगावी जाणाऱ्या गाड्याही 2 तास उशिर
CSMT वर रेल्वेचा खोळंबा! प्रवाशांची प्रचंड गर्दी, लोकलसह बाहेरगावी जाणाऱ्या गाड्याही 2 तास उशिराने
राज्य सरकारने आनंदाचा शिधा योजना बंद केल्यानंतरही शिवसेनेकडून...
राज्य सरकारने आनंदाचा शिधा योजना बंद केल्यानंतरही शिवसेनेकडून दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात
आता 100 टक्के इथेनॉलवर धावणार गाड्या! केंद्र सरकारचा मोठा निर्णय,
आता 100 टक्के इथेनॉलवर धावणार गाड्या! केंद्र सरकारचा मोठा निर्णय, इंधन आयातही घटणार
काँग्रेसचा दिल्लीत एल्गार! 1 नोव्हेंबरला ज्ञानेश कुमारांच्या विरोधात..
काँग्रेसचा दिल्लीत एल्गार! 1 नोव्हेंबरला ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मोठे आंदोलन
सयाजी शिंदे यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे कळकळीची मागणी
एकही झाड तोडू नका! सयाजी शिंदे यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे कळकळीची मागणी
आदित्य ठाकरे यांचा कर्जत दौरा, वृक्षतोडीवरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार...
आदित्य ठाकरे यांचा कर्जत दौरा, वृक्षतोडीवरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका
500 कोटींची AI ऑडिओ क्लिप... मनोज जरांगे स्पष्टच बोलले, क्लिप बनवणारा.
500 कोटींची AI ऑडिओ क्लिप... मनोज जरांगे स्पष्टच बोलले, ही क्लिप बनवणाऱ्या व्यक्तीबाबत मोठी माहिती
महाराष्ट्राच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य! तेलंगणाला सहकार्य करताना...
महाराष्ट्राच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य! तेलंगणाला सहकार्य करताना फडणवीसांची स्पष्ट भूमिका