GT vs PBKS IPL 2022: तो आला, त्याने गुजरातच्या गोलंदाजांना धुतलं, मॅच संपवली, लिव्हिंगस्टोनचा धमाका, पाहा Special Moments

| Updated on: May 03, 2022 | 11:52 PM

मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्सने 10 पैकी पाच सामन्यात विजय तर पाच सामन्यात पराभव झाला आहे. आजच्या विजयामुळे पंजाब किंग्सला दोन पॉइंटस मिळालेच आहेत. पण रनरेटही वाढला आहे.

GT vs PBKS IPL 2022: तो आला, त्याने गुजरातच्या गोलंदाजांना धुतलं, मॅच संपवली, लिव्हिंगस्टोनचा धमाका, पाहा Special Moments
liam-livingstone
Follow us on

मुंबई: पंजाब किंग्सने आज बलाढ्य गुजरात टायटन्सचा (PBKS vs GT) पराभव केला. प्लेऑफमधील आव्हान कायम ठेवण्यासाठी पंजाबला आज विजय आवश्यक होता. पंजाबने आठ विकेट आणि तब्बल 24 चेंडू राखून विजय मिळवला. गुजरात टायटन्सचा स्पर्धेतील हा दुसरा पराभव आहे. आतापर्यंत दहा पैकी आठ सामने त्यांनी जिंकले आहेत. मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्सने 10 पैकी पाच सामन्यात विजय तर पाच सामन्यात पराभव झाला आहे. आजच्या विजयामुळे पंजाब किंग्सला दोन पॉइंटस मिळालेच आहेत. पण रनरेटही वाढला आहे. पंजाब किंग्सच्या विजयाचे नायक आहेत, कागिसो रबाडा, सलामीवीर शिखर धवन, भानुका राजपक्षे आणि (Liam Livingstone)लियाम लिव्हिंगस्टोन. शिखर धवनने (Shikhar Dhawan) 53 चेंडूत नाबाद 62 आणि लिव्हिंगस्टोनने 10 चेंडूत नाबाद 30 धावा केल्या. लिव्हिंगस्टोनच्या बॅटिंगमुळे चार ओव्हर आधीच मॅच संपली. त्याने नेहमीच्या स्टाइलमध्ये फटकेबाजी केली. लिव्हिंगस्टोनने दोन चौकार आणि तीन षटकार ठोकले.

लियाम लिव्हिंगस्टोनची 10 चेंडूतील तुफानी खेळी चुकवू नका, त्यासाठी इथे क्लिक करा

साई सुदर्शन वगळता सगळे फेल

यंदाच्या सीजनमधला दोन्ही टीम्समधला हा दुसरा सामना होता. पहिला सामना गुजरातने तर दुसरा पंजाबने जिंकला. हार्दिकने टॉस जिंकून फलंदाजी स्वीकारली. पण आज त्यांचा संघ नेहमीच्या फॉर्ममध्ये दिसला नाही. एकट्या साई सुदर्शनचा नाबाद (65) अपवाद वगळता अन्य फलंदाजांनी निराशा केली. शुभमन गिल, हार्दिक पंड्या, डेविड मिलर आणि राहुल तेवतिया स्वस्तात बाद झाले.

इथे क्लिक करुन काही मिनिटांमध्ये पाहून घ्या मॅचच्या सर्व Highligths

पंजाबची भन्नाट गोलंदाजी

पंजाब किंग्सच्या गोलंदाजांनी आज सुरुवातीपासून गुजरातच्या फलंदाजांना जखडून ठेवलं. ठराविक टप्प्याने त्यांचे फलंदाज बाद होत राहिले. कागिसो रबाडाराने सर्वात भेदक मारा केला. त्याने चार षटकात 33 धावा देत चार महत्त्वाच्या विकेट काढल्या. राहुल तेवतिया, राशिद खान या मॅच विनर्सना त्यानेच माघारी धाडलं. त्यामुळे पंजाबला आज मोठी धावसंख्या उभारता आली नाही. हार्दिक पंड्याही आज फारवेळ टिकला नाही.

शिखर-भानुका राजपक्षेने सावरला डाव

144 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्सची सुरुवात चांगली झाली नाही. जॉनी बेयरस्टो अवघ्या एक रन्सवर आऊट झाला. मोहम्मद शमीने त्याला प्रदीप सांगवानकरवी झेलबाद केलं. पण त्यानंतर शिखर धवनने भानुका राजपक्षेच्या साथीने मिळून डाव सावरला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी केली. राजपक्षे 28 चेंडूत 40 तर शिखरने 53 चेंडूत 62 धावा केल्या. लिव्हिंगस्टोनने तर 10 चेंडूत 30 धावा फटकावून चार षटक राखून मॅचच संपवून टाकली.