IPL 2022, PBKS vs RR: जैस्वालमुळे राजस्थान ‘यशस्वी’, पंजाबची हालत खराब, Must Watch VIDEOS

| Updated on: May 07, 2022 | 7:52 PM

IPL 2022, PBKS vs RR: या विजयासह राजस्थान रॉयल्सने महत्त्वाचे दोन पॉइंटस मिळवले आहेत. राजस्थानने प्लेऑफच्या दिशेने एक दमदार पाऊल टाकलं आहे.

IPL 2022, PBKS vs RR: जैस्वालमुळे राजस्थान यशस्वी, पंजाबची हालत खराब, Must Watch VIDEOS
rr vs rcb
Follow us on

मुंबई: वानखेडे स्टेडियमवर आज इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेतील 52 वा सामना झाला. राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) हा सामना जिंकला. पंजाब किंग्सने (Punjab kings) दिलेलं 190 धावांच विशाल लक्ष्य राजस्थानने शेवटच्या षटकात पार केलं. यशस्वी जैस्वाल आणि शिमरॉन हेटमायर राजस्थानच्या विजयाचे नायक ठरले. यशस्वीची 41 चेंडूतील 68 धावांची खेळी आणि हेटमारच्या 16 चेंडूतील नाबाद 31 धावा राजस्थानच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरल्या. राजस्थानच्या विजयात जोस बटलर (30), संजू सॅमसन (23) आणि देवदत्त पडिक्कलने (31) धावांच योगदान दिलं. यशस्वी जैस्वालने राजस्थानच्या विजयाचा पाया रचला. अखेरीस वेगाने धावा फटकावण्याची गरज असताना, हेटमायरने पावर हिटिंगचा शो दाखवला.

पॉइंटस टेबलमध्ये कोण सरस?

या विजयासह राजस्थान रॉयल्सने महत्त्वाचे दोन पॉइंटस मिळवले आहेत. राजस्थानने प्लेऑफच्या दिशेने एक दमदार पाऊल टाकलं आहे. पॉइंटस टेबलमध्ये राजस्थानचा संघ अजूनही तिसऱ्ंयाच स्थानावर आहे. त्यांचे 14 पॉइंटस झाले आहेत. लखनौ सुपर जायंट्सचेही 14 गुण आहेत. या पराभवामुळे पंजाब किंग्सचा पुढचा प्रवास अजून खडतर झाला आहे. 10 पॉइंटससह ते सातव्या स्थानावर आहेत. 11 सामन्यात पंजाब किंग्सचे पाच विजय आणि सहा पराभव आहेत.

राजस्थानचा संघ ज्याच्या बळावर ‘यशस्वी’ ठरला त्याची बॅटिंग इथे क्लिक करुन पहा

जॉनी बेयरस्टोचं मोसमातील पहिलं अर्धशतक

जॉनी बेयरस्टोचं (56) अर्धशतक आणि जितेश शर्माची नाबाद (38) फटकेबाजी याच्या बळावर पंजाब किंग्सने प्रथम फलंदाजी करताना पाच बाद 189 धावा केल्या. 190 या लक्ष्याचा पाठलाग करायला मैदानात उतरलेल्या राजस्थान रॉयल्सने चांगली सुरुवात केली. जोस बटलर आणि यशस्वी जैस्वाल ही राजस्थानची सलामीची जोडी फलंदाजीसाठी मैदानात उतरली होती. जोस बटलरने नेहमीप्रमाणे आक्रमक सुरुवात केली होती. चार षटकातच धावफलकावर 46 धावा लावल्या होत्या.