IPL Media Rights: पॅकेज C साठी घमासान, डिज्नी-वायकॉम मध्ये कांटे की टक्कर, मुल्य पोहोचलं 2400 कोटींच्या घरात

| Updated on: Jun 14, 2022 | 3:51 PM

IPL मध्ये मीडिया राइट्सचा (IPL Media Rights) लिलाव अजूनही संपलेला नाही. आज लिलावाचा तिसरा दिवस आहे. कालच या डीलची रक्कम 44 हजार कोटींच्या घरात पोहोचली होती.

IPL Media Rights: पॅकेज C साठी घमासान, डिज्नी-वायकॉम मध्ये कांटे की टक्कर, मुल्य पोहोचलं 2400 कोटींच्या घरात
IPL
Image Credit source: social
Follow us on

मुंबई: IPL मध्ये मीडिया राइट्सचा (IPL Media Rights) लिलाव अजूनही संपलेला नाही. आज लिलावाचा तिसरा दिवस आहे. कालच या डीलची रक्कम 44 हजार कोटींच्या घरात पोहोचली होती. टीवी राइट्सचे अधिकार म्हणजे पॅकेज ए ‘डिज्नी स्टार’ ने मिळवले आहेत, तर डिजिटल राइट्स म्हणजे पॅकेज बी ‘Viacom 18‘ ने मिळवलेत. यावर फक्त अजून अधिकृत शिक्कामोर्तब व्हायचं बाकी आहे. आता पॅकेज सी (Package c) साठी बीडिंग सुरु आहे. पॅकेज ए आणि बी च्या तुलनेत सी जिंकण्यासाठी बोलीमध्ये मोठी चुरस पहायला मिळत आहे. पॅकेज सी मध्ये 18 सामन्यांचा सेट आहे. यात पाच सीजनचे प्लेऑफ आणि अंतिम सामन्याचा समावेश आहे. यामध्ये पॅकेज बी जिंकणारा पॅकेज सी च्या अधिकारावर पाणी सोडणार नाही. त्यामुळे पॅकेज सी साठी काटे की टक्कर पहायला मिळतेय.

पॅकेज बी जिंकणारा पॅकेज सी नाही सोडणार

वायकॉम 18 ने पॅकेज बी मिळवलं आहे. त्यामुळे पॅकेज सी ते सोडणार नाहीत. यात डिजिटल राइट्स आहेत. दुसऱ्या कंपनीला या 18 सामन्यांच्या प्रसारणाचा अधिकार मिळाला, तर त्याचा वायकॉम 18 ला फटका बसेल. कारण त्यांनी पॅकेज बी मध्ये प्रत्येक सामन्याच्या डिजिटल प्रसारणासाठी 50 कोटी रुपये मोजले आहेत.

लिलावाच एकूण मुल्य 46,500 कोटींच्या घरात

सध्या डिज्नी हॉटस्टार पॅकेज सी मिळवण्यासाठी आक्रमक पद्धतीने बोली लावत आहे. पॅकेज सी मध्ये प्रतिसामना बेसिक प्राइस 18.5 कोटी रुपये होती. बीडींग प्रोसेसमध्ये ही किंमत 24 कोटींच्या पुढे गेली आहे. वायकॉम 18 ही प्लेऑफ सामन्यांच्या प्रसारण अधिकार मिळवण्यासाठी स्पर्धेत आहे. पॅकेज सी चं मुल्य 2400 कोटीपर्यंत पोहोचलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे. लिलावाच एकूण मुल्य 46,500 कोटींच्या घरात गेलं आहे. पॅकेज डी अजून यायचं आहे. यात भारतीय उपखंडाबाहेरील सामन्याचे प्रसारण अधिकार आहेत.

एकूण 410 सामन्यासाठी एवढी मोठी रक्कम

2023 ते 2027 साठी IPL च्या टीवी आणि डिजिटल राइट्सची डील झाली आहे. एकूण 410 सामन्यासाठी एवढी मोठी रक्कम मोजण्यात आली आहे. मीडिया राइट्सची बेस प्राइस 32 हजार कोटी रुपये होती. पॅकेज ए म्हणजे टीवी राइट्सची बेस प्राइस 49 कोटी रुपये होती. पॅकेज बी डिजिटल राइट्सची बेस प्राइस 33 कोटी रुपये होती. पॅकेज सी ची बेस प्राइस 11 कोटी आणि पॅकेज डी ची बेस प्राइस 3 कोटी रुपये होती.