

मालती चहर 2018 च्या आयपीएलमध्ये एक मिस्ट्री गर्ल चांगलीच चर्चेत आलेली. विशेष सांगायचं तर ही मिस्ट्री गर्ल दुसरी तिसरी कोण नसून चहर बंधूंची बहीण मालती चहर होती. ती चेन्नई-मुंबईचा सामना पाहण्यासाठी आली होती. या सामन्यादरम्यान ती कॅमेऱ्यात कैद झाल्याने रातोरात प्रसिद्ध झाली होती.

रियाना लालवानी आयपीएल 2020 मध्ये मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात सुपर ओव्हरचा सामना रंगला होता. या रंगतदार सामन्यादरम्यान अचानक एक मिस्ट्री गर्ल कॅमेऱ्यात कैद झाली होती. या मिस्ट्री गर्लचे नाव आहे रियाना लालवानी. कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर रियानासुद्धा चांगलीच प्रसिद्ध झाली होती.

अदिती हुंडिया 2019 च्या आयपीएल दरम्यान, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामना पाहण्यासाठी एक मिस्ट्री गर्ल आली होती. ती कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर तिचे सौंदर्य पाहून चाहते तिच्या प्रेमात पडले होते. या मिस्ट्री गर्लचं नाव आहे अदिती हुंडिया. सामन्यादरम्यान अदिती प्रसिद्धीच्या झोतात आली होती. तसंच अदिती ही एक मॉडेल आहे.

दीपिका घोष आयपीएल 2019 मध्ये आरसीबीची एक महिला फॅन चर्चेत आली होती. आरसीबीला सपोर्ट करताना चिन्नास्वामी स्टेडियमवर दीपिका घोष नावाची चाहती कॅमेऱ्यात कैद झाली होती. त्यानंतर ती सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत होती.