
आयपीएलच्या 17 व्या मोसमात 31 मार्च रोजी डबल हेडरचं आयोजन करण्यात आलं होतं. पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने होते. तर दुसऱ्या मॅचमध्ये दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स भिडले. गुजरातने डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात हैदराबादवर 7 विकेट्सने विजय मिळवला. तर दुसऱ्या मॅचमध्ये दिल्लीने 21 चेन्नईवर मात केली. या डबल हेडरच्या निकालानंतर ऑरेंज कॅपच्या टॉप 5 मध्ये बदल झाले आहेत. डबल हेडरनंतर ऑरेंज कॅपच्या शर्यतीत कोण कुठे आहे, हे जाणून घेऊयात.
आयपीएलच्या 17 व्या हंगामातील 13 सामन्यानंतर आरसीबीचा आक्रमक फलंदाज विराट कोहली याच्याकडे कायम आहे. हैदराबादच्या हेन्रिक क्लासेन याने गुजरात विरुद्ध 24 धावा केल्या. हेन्रिकने या धावांसह आपलं दुसरं स्थान आणखी भक्कम केलं. पंजाबचा कॅप्टन शिखर धवन तिसऱ्या स्थानी कायम आहे. दिल्लीचा ओपनर बॅट्समन डेव्हीड वॉर्नर याने चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध 35 बॉलमध्ये 52 धावा केल्या. त्यामुळे वॉर्नर चौथ्या स्थानी पोहचला आहे. तर राजस्थानचा युवा फलंदाज रियान पराग पाचव्या स्थानी आहे.
ऑरेँज कॅपच्या शर्यतीत असलेल्या या टॉप 5 फलंदाजांच्या किमान 120 पेक्षा अधिक धावा आहेत. तर ऑरेंज कॅप होल्डर विराट कोहली हा एकटाच 180 धावांच्या पार पोहचलेला आहे. विराटच्या नावावर 3 सामन्यात 181 धावा आहेत. हेन्रिक क्लासेन याने 3 सामन्यात 167 धावा केल्यात. शिखर धवन याच्या नावावर 137 रन्सची नोंद आहे. डेव्हीड वॉर्नरच्या 3 मॅचमध्ये 130 रन्स आहेत. तर रियान पराग हा 2 सामन्यांमध्ये 127 धावांसह पाचव्या क्रमांकावर आहे.
| प्लेयर्स | सामने | स्ट्राईक रेट | रन्स |
|---|---|---|---|
| विराट कोहली | 4 | 140.97 | 203 |
| रियान पराग | 3 | 160.17 | 181 |
| हेनरिक क्लासेन | 3 | 219.73 | 167 |
| शुबमन गिल | 4 | 159.22 | 164 |
| साई सुदर्शन | 4 | 160 | 128.00 |
दिल्ली कॅपिट्ल्स प्लेईंग ईलेव्हन : ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, एनरिक नॉर्टजे, मुकेश कुमार, इशांत शर्मा आणि खलील अहमद.
चेन्नई सुपर किंग्स प्लेईंग ईलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), रचीन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिचेल, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मथीशा पथिराना आणि मुस्तफिजुर रहमान