IPL 2024 Orange Cap : ऑरेंज कॅपच्या शर्यतीत टॉपवर कोण?

IPL 2024 Orange Cap, Highest run scorer : आयपीएलच्या प्रत्येक हंगामात फलंदाजांमध्ये ऑरेंज कॅप मिळवण्यासाठी चढाओढ पाहायला मिळत असते. ही मानाची ऑरेंज कॅप सध्या कुणाकडे आहे?

IPL 2024 Orange Cap : ऑरेंज कॅपच्या शर्यतीत टॉपवर कोण?
ipl orange cap,
| Updated on: Apr 08, 2024 | 12:18 AM

आयपीएल 17 व्या हंगामात रविवारी 7 एप्रिलला डबल हेडरचं आयोजन केलं गेलं होतं. डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर मात करत या हंगामातील विजयाचं खातं उघडलं. तर दुसऱ्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने गुजरात टायटन्सला पराभूत केलं. या डबल हेडरनंतर ऑरेंज कॅपच्या शर्यतीतील टॉप 5 मध्ये काही बदल झाले आहेत. त्यामध्ये नक्की काय बदल झालेत? तसेच ऑरेंज कॅप कुणाकडे आहे? हे? हे जाणून घेऊयात.

ऑरेंज कॅप कुणाकडे?

रॉयल चॅलेंजर्सचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली याच्याकडे ऑरेंज कॅप कायम आहे. गुजरातचा फलंदाज साई सुदर्शन याने लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध 31 धावांची खेळी केली. साईला त्याचा फायदा झाला. साईने या 31 धावांसह टॉप 5 मध्ये दुसऱ्या स्थानी झेप घेतली. त्यामुळे दुसऱ्या स्थानी असलेला राजस्थान रॉयल्सचा रियान पराग तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. तर तिसऱ्या स्थानावर असलेला राजस्थानचा कॅप्टन संजू सॅमसन सहाव्या स्थानी फेकला गेलाय.

शुबमन गिल याला फायदा

तसेच गुजरात टायटन्सचा कॅप्टन शुबमन गिल याला एका स्थानाचा फायदा झालाय. शुबमन 6 एप्रिलला पाचव्या क्रमांकावर होता. शुबमनने लखनऊ विरुद्ध 19 धावा केल्या. त्यामुळे चौथ्या स्थानी पोहचला आहे. शुबमनमुळे 6 एप्रिलला चौथ्या क्रमांकावर असलेला हैदराबादचा हेन्रिक क्लासेन टॉप 5 मधून बाहेर पडला आहे. तर लखनऊचा उपकर्णधार निकोलस पूरन पाचव्या स्थानी आला आहे. निकोलस पूरन याने गुजरात विरुद्ध 22 बॉलमध्ये 32 धावांची नाबाद खेळी केली. त्याचा निकोलसला फायदा झालाय.

गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : शुबमन गिल (कर्णधार), शरथ बीआर (विकेटकीपर), साई सुधारसन, विजय शंकर, राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, उमेश यादव, स्पेन्सर जॉन्सन, दर्शन नळकांडे आणि मोहित शर्मा.

लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग ईलेव्हन : केएल राहुल (कर्णधार आणि विकेटकीपर), क्विंटन डी कॉक, देवदत्त पडिक्कल, मार्कस स्टॉयनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, रवी बिश्नोई, यश ठाकुर, नवीन-उल-हक आणि मयंक यादव.