IPL 2024 Orange Cap : राजस्थानच्या रियान परागची मोठी झेप, फक्त इतक्या धावांनी हुकली मानाची कॅप

| Updated on: Mar 28, 2024 | 11:27 PM

आयपीएल 2024 स्पर्धेत ऑरेंज कॅपची चुरस दिवसागणिक वाढत चालली आहे. या कॅपच्या रेसमध्ये प्रत्येक सामन्यानंतर खेळाडूंची एन्ट्री होत आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात मोठी खेळी करत रियान परागने ऑरेंज कॅपच्या शर्यतीती एन्ट्री घेतली.

IPL 2024 Orange Cap : राजस्थानच्या रियान परागची मोठी झेप, फक्त इतक्या धावांनी हुकली मानाची कॅप
Follow us on

आयपीएल 2024 स्पर्धेच्या नवव्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना रंगला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या राजस्थान रॉयल्सची सुरुवात एकदम धीमी झाली. तसेच यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन आणि जोस बटलर या विकेट्स झटपट पडल्या. त्यामुळे राजस्थानचा संघ अडचणीत आला होता. संकटाच्या काळात रियान परागने आर अश्विन आणि ध्रुव जुरेल सोबत महत्त्वाची भागीदारी केली. तसेच दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. रियान परागने 45 चेंडूत 6 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने नाबाद 84 धावांची खेळी केली. इतकंच काय शेवटच्या षटकात 6 चेंडूत 25 धावा कुटल्या. या खेळीसह ऑरेंज कॅपच्या शर्यतीत उडी घेतली आहे. मात्र सध्यातरी मुंबई इंडियन्सविरुद्ध झंझावती खेळी करणारा हेन्रिक क्लासेन अव्वल स्थानीच आहे. मात्र विराट कोहली, संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांना पाठी टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.

हेन्रिक क्लासेने दोन सामन्यात 143 धावा केल्या आणि अव्वल स्थान गाठलं आहे. यात त्याने दोन अर्धशतकं ठोकली आहेत. 226.98 च्या स्ट्राईक रेटने त्याने या धावा केल्या आहेत. यात मुंबई इंडियन्सविरुद्धची नाबाद 80 धावांची खेळी सर्वोत्तम राहिली. रियान पराग या शर्यतीत दुसऱ्या स्थानावर आहे. रियानची ऑरेंज कॅप 16 धावांनी हुकली. दिल्ली विरुद्धच्या सामन्यात रियान परागने नाबाद 84 धावांची खेळी केली. 127 धावांसह रियान दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विराट कोहली असून त्याने दोन सामन्यात 98 धावा केल्या आहेत. चौथ्या स्थानावर राजस्थान रॉयल्सचा संजू सॅमसन असून त्याने 97 धावा केल्या आहेत. तर अभिषेक शर्मा पाचव्या स्थानावर असून त्याने 95 धावा केल्या आहेत.

प्लेयर्ससामनेस्ट्राईक रेटरन्स
विराट कोहली4140.97203
रियान पराग3160.17181
हेनरिक क्लासेन3219.73167
शुबमन गिल4159.22164
साई सुदर्शन4160128.00

दरम्यान राजस्थान रॉयल्स संगाने 20 षटकात 5 गडी गमवून 185 धावा केल्या आणि विजयाशाठी 186 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण दिल्ली कॅपिटल्सला  धावांपर्यंत मजल मारता आली. यासह दिल्ली कॅपिटल्सचा या सामन्यात  12 धावांनी पराभव झाला. दिल्ली कॅपिटल्सचा या स्पर्धेतील सलग दुसरा पराभव, तर राजस्थान रॉयल्स संघाचा हा सलग दुसरा विजय आहे.