‘हे तुझं मुल नाहीये…’, IPLच्या काळात क्रिकेटपटू पतीच्या मित्रासोबतच थाटला पत्नीने संसार

एका क्रिकेटपटूने त्याच्या बालपणीच्या मैत्रिणशी लग्न केले होते. मात्र, लग्नानंतर तिने जे काही केले ते पाहून सर्वजण चकीत झाले.

हे तुझं मुल नाहीये..., IPLच्या काळात क्रिकेटपटू पतीच्या मित्रासोबतच थाटला पत्नीने संसार
Dinesh Kartik ani Nikita
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: Apr 04, 2025 | 4:04 PM

क्रिकेटपटूंचे आयुष्य हे कायमच चर्चेत असते. कोणता खेळाडू कोणाला डेट करत आहे? कोणता खेळाडू घटस्फोट घेत आहे या सर्व चर्चा सुरू असतात. यामध्ये क्रिकेटपटू मुरली विजयचा देखील समावेश आहे. त्याने भारतीय क्रिकेट संघाकडून 61 कसोटी, 17 वनडे आणि 9 टी-20 सामने खेळले आहेत. मुरली विजय हा त्याच्या खेळासोबतच कायम खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिला आहे. त्याच्या प्रेम कहाणीने एकेकाळी सर्वांचे लक्ष वेधले होते. आता नेमकं काय झालं होतं चला जाणून घेऊया…

मुरली विजय आणि दिनेश कार्तिक हे खूप चांगले मित्र होते. पण मुरली विजय हा त्याच्या सर्व सीमा विसरुन दिनेश कार्तिकच्या पत्नीच्या प्रेमात पडला होता. या प्रकरणामुळे त्यांच्या खासगी आयुष्यात मोठे वादळ आले होते.

वाचा: ‘मी गुंड असतो तर बरं झालं असतं’, सलमानच्या सिकंदरमुळे मराठी सिनेमा हटवल्यामुळे अभिनेता संतापला

मुरली विजय आणि दिनेश कार्तिक यांची मैत्री जगजाहीर होती. ते दोघे सतत एकत्र असायचे. अनेकदा मुरली विजय हा दिनेशच्या घरी जायचा. त्यामुळे मुरली विजयची दिनेश कार्तिकच्या पत्नीशी ओळख झाली होती. त्यांच्यामध्ये हळूहळू संवाद सुरु झाला होता. त्या दोघांमध्ये चांगली मैत्री देखील झाली. पण, मुरली विजय आणि दिनेश कार्तिकची पत्नी एकमेकांच्या कधी प्रेमात पडले कळाले देखील नाही. मुरली विजयने सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या.

आयपीएल सामन्यानंतर निर्माण झाली जवळीक

दिनेश कार्तिकच्या पत्नीचे नाव निकिता वंजारा होते. मुरली, दिनेश आणि निकिता हे अनेकदा घरात एकत्र वेळ घालवत असत. दिनेश आणि मुरली हे चांगले मित्र असल्यामुळे कोणाच्या मनात इतर गोष्टी आल्या नव्हत्या. पण, मुरली विजय त्याच्या मित्रासोबतचे नाते विसरून त्याची पत्नी निकिता वंजाराच्या प्रेमात पडला. याच कारणामुळे मुरली विजय आणि दिनेश कार्तिक यांच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाला. एका आयपीएल सामन्याच्या वेळी निकिता आली होती. त्यानंतर मुरली आणि निकिता यांचा संवाद वाढला होता. त्यांना एकमेकांच्या सवयी आवडू लागल्या. ते दोघे एकमेकांच्या इतके प्रेमात होते की त्यांनी दिनेशची पर्वाही केली नाही.

२००७मध्ये केले होते लग्न

काही दिवसांनंतर मुरली विजय आणि निकिताने एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. या सगळ्यामुळे दिनेश कार्तिकला वैयक्तिक आयुष्यात वेदनादायक अनुभवाला सामोरे जावे लागले. दिनेश कार्तिक आणि निकिता वंजारा हे बालपणापासूनचे मित्र होते. त्यांनी २००७मध्ये लग्न केले होते. २०१२मध्ये एका स्थानिक क्रिकेट सामन्यात व्यग्र असताना कार्तिकला हे सत्य कळाले. त्यामुळे त्याला मोठा धक्का बसला. अचानक दिनेश कार्तिकची बायको आली आणि त्याला म्हणाली, ‘माझ्या पोटात मुरली विजयचे मूल असून मला घटस्फोट हवा आहे.’ पायाखालची जमीन सरकणे म्हणजे काय असते, याचा अनुभव त्या दिवशी दिनेश कार्तिकला आला. त्याने लगेच निकिताला घटस्फोट दिला. विशेष म्हणजे, घटस्फोटानंतर लगेचच निकिताने मुरली विजयसोबत लग्न केले. २०१५मध्ये प्रसिद्ध स्क्वॉश खेळाडू दीपिका पल्लीकलशी त्याने लग्न केले.