IPL 2023 Points Table मध्ये पहिल्या स्थानावर कुठली टीम? तळाला कोण? जाणून घ्या

| Updated on: Apr 06, 2023 | 9:47 AM

IPL 2023 Points Table in Marathi : टुर्नामेंटच्या 16 व्या सीजनमध्ये आतापर्यंत 8 सामने झाले आहेत. यात 6 टीम्सनी प्रत्येकी 2-2 सामने खेळले आहेत. 6 टीम्सनी विजयासह आपलं खात उघडलय. 4 टीम्स पॉइंट्सच्या शोधात आहेत.

IPL 2023 Points Table मध्ये पहिल्या स्थानावर कुठली टीम? तळाला कोण? जाणून घ्या
pbks
Image Credit source: BCCI
Follow us on

IPL 2023 Points Table : IPL 2023 चा सीजन हळूहळू वेग पकडतोय. टुर्नामेंटमध्ये दुसऱ्या टप्प्यातील लीग सामने सुरु झाले आहेत. अशावेळी जे रिझल्ट येत आहेत, त्याचा थेट परिणाम पॉइंट्स टेबलवर दिसतोय. बुधवारी राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्समध्ये झालेल्या सामन्याचा हाच परिणाम दिसून आला. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली पंजाबच्या टीमने विजय मिळवला. पंजाबने राजस्थान टीमला हरवलचं. पण पॉइंट्स टेबलमध्येही त्यांच्या पुढे निघून गेले.

गुवाहाटीमध्ये पहिल्यांदा आयपीएल सामना खेळला गेला. अपेक्षेनुसार, सामना रोमांचक ठरला. अगदी शेवटच्या चेंडूवर सामन्याचा निकाल लागला. पंजाबने पहिली बॅटिंग करताना 197 धावा केल्या. राजस्थानची टीम प्रत्युत्तरात 192 धावांपर्यंत पोहोचली. 5 रन्सनी त्यांचा पराभव झाला. पंजाबच्या विजयात कॅप्टन शिखर धवन 86 रन्स आणि नाथन ऐलिस 4 विकेट यांनी महत्वाच योगदान दिलं.

पंजाबची मोठी झेप

पंजाबच्या टीमने आपले दोन सामने जिंकले असून त्यांचे 4 पॉइंट्स झाले आहेत. विजयाच अंतर फार मोठं नव्हतं. ते गुजरात टायटन्सला मागे टाकू शकले नाहीत. दोन्ही सामने जिंकून गुजरातची टीम पहिल्या स्थानावर आहे. नेट रनरेटच्या शर्यतीत गुजरात (0.700) पंजाबच्या (0.333) पुढे आहे. एका विजयामुळे पंजाबने मोठी झेप घेतली आहे. ते पाचव्यावरुन दुसऱ्या नंबरवर आले आहेत.

टीम सामना विजय पराजय नेट रनरेट पॉइंट्स
राजस्थान रॉयल्स 321+2.0674
लखनौ सुपर जायंट्स 321+1.3584
गुजरात टायटन्स 220+0.7004
चेन्नई सुपर किंग्स321+0.3564
पंजाब किंग्स 220+0.3334
कोलकता नाइट रायडर्स 211+2.0562
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर 211-1.2562
मुंबई इंडियन्स 202-1.3940
दिल्ली कॅपिटल्स 303-2.0920
सनरायजर्स हैदराबाद 202-2.8670

राजस्थानची टीम पराभवानंतर दुसऱ्यावरुन (1.675) चौथ्या नंबरवर घसरली आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा NRR (1.981) खाली आलाय. बँगलोरची टीम तिसऱ्या नंबरवर आहे. दोघांचे दोन-दोन पॉइंट्स आहेत.

या टीमकडे पहिल्या स्थानावर पोहोचण्याची संधी

बँगलोरच्या टीमकडे आता पहिल्या स्थानावर पोहोचण्याची संधी आहे. गुरुवारी त्यांचा सामना कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध आहे. इडन गार्डन्सवर होणाऱ्या सामन्यात RCB टीम जिंकली, तर गुजरातच पहिलं स्थान जाऊ शकतं. कोलकाताची नजर या मॅचमध्ये खात उघडण्यावर असेल. पंजाबने पहिल्या सामन्यात केकेआरचा पराभव केला होता.