RR vs PBKS : कॅप्टन Sanju Samson ची एक घोडचूक राजस्थान रॉयल्सला महाग पडली, जिंकायची मॅच हरली

IPL 2023 RR vs PBKS : संजू सॅमसन इतका विचित्र निर्णय कसा घेऊ शकतो?. महत्वाच म्हणजे संजू सॅमसनकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. त्यामुळे त्याच्याकडून अशी अपेक्षा नाहीय.

RR vs PBKS : कॅप्टन Sanju Samson ची एक घोडचूक राजस्थान रॉयल्सला महाग पडली, जिंकायची मॅच हरली
Sanju samson Image Credit source: IPLT20.COM
Follow us
| Updated on: Apr 06, 2023 | 8:59 AM

IPL 2023 RR vs PBKS : इंडियन प्रीमियर लीगमध्ये बुधवारी राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्समध्ये सामना झाला. या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सचा 5 धावांनी पराभव झाला. पंजाबचा कॅप्टन शिखर धवन (56 चेंडूत 86 रन्स, नऊ चौकार, तीन षटकार) आणि प्रभसिमरन सिंह (34 चेंडूत 60 रन्स, सात चौके, तीन षटकार) यांनी पहिल्या विकेटसाठी 90 धावांची भागीदारी केली. पंजाब किंग्सने पहिली बॅटिंग करताना चार विकेटवर 197 धावा केल्या. धवनने जितेश शर्मासोबत (27) दुसऱ्या विकेटसाठी 66 धावांची भागीदारी केली.

राजस्थानकडून कोण चांगलं खेळलं?

प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सची टीम 192 धावांपर्यंत पोहोचली. राजस्थानकडून शिमरॉन हेटमायर (17 चेंडू 36 रन्स, तीन सिक्स, एक फोर) आणि ध्रुव जुरेलने (15 चेंडूत नाबाद 32, दोन सिक्स, तीन फोर) यांनी सातव्या विकेटसाठी 26 चेंडूत 61 धावांची भागीदारी केली. कॅप्टन संजू सॅमसनने राजस्थानकडून सर्वाधिक 42 धावा केल्या.

संजू सॅमसनने त्याच्या घोडचुकीवर काय उत्तर दिलं?

राजस्थान रॉयल्सकडून जोस बटलरने डावाची सुरुवात केली नाही. देवदत्त पडिक्कलऐवजी सॅमसनने आर. अश्विनला सलामीला पाठवलं. तीच संजू सॅमसनची मोठी चूक ठरली. अश्विन अवघ्या 4 चेंडूत शुन्यावर आऊट झाला. अर्शदीप सिंहने त्याला शिखर धवनकरवी झेलबाद केलं. देवदत्त पडिक्कलऐवजी अश्विनला सलामीला पाठवण्याच्या निर्णयावर संजूला प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला की, “जोस फिट नव्हता. कॅच पकडताना दुखापत झाल्याने त्याच्या बोटाला टाके पडले होता. पंजाबकडे दोन स्पिनर आहेत, त्यामुळे देवदत्तला ओपनिंगला पाठवलं नाही. आम्हाला मधल्या ओव्हर्समध्ये लेफ्टी बॅट्समनची गरज होती” कोण आहे ध्रुव जुरेल?

संजू सॅमसनने ध्रुव जुरेलच कौतुक केलं. “ध्रुव मागच्या दोन सीजनपासून आमच्यासोबत आहे. आम्ही सर्व खुश आहोत. जेव्हा तुम्ही आयपील खेळण्यासाठी येता, तेव्हा एका आठवडाआधी शिबिर असतं. ध्रुव सारखा फलंदाज टीममध्ये आहे, त्यामुळे मी आनंदी आहे” असं संजू म्हणाला. ध्रुव जुरेलने लोअर ऑर्डरमध्ये बॅटिंग करताना 15 चेंडूत 32 धावा फटकावल्या. यात 3 फोर, 2 सिक्स आहेत.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.