
पर्पल कॅप हा मानाचा पुरस्कार आयपीएल हंगामात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूला दिला जातो. पर्पल कॅप जिंकणाऱ्या खेळाडूला हंगामातील सर्वोत्तम गोलंदाज मानलं जातं. सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप आणि 15 लाख रुपये आणि ट्रॉफी दिली जाते. तसं पाहिलं तर आयपीएलमध्ये गोलंदाजांची सर्वाधिक धुलाई होते. मात्र असं असूनही काही गोलंदाज आपली छाप सोडतात. फलंदाजांना फटकेबाजी करण्यास रोखतात. असंच काहीसं चित्र चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या सामन्यात पाहायला मिळालं. बंगळुरुचा कर्णधार फाफ डु प्लेसिस आणि विराट कोहली ही जोडी मैदानात उतरली होती. फाफकडून जबरदस्त धुलाई सुरु होती. या जोडीने 41 धावा केल्या होत्या. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सचे गोलंदाज काही अंशी हतबल दिसत होते. मात्र पाचवं षटक ऋतुराज गायकवाड याने बांगलादेशच्या मुस्तफिझुर रहमान याच्याकडे सोपवलं आणि दुसऱ्या चेंडूपासूनच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हा संघ बॅकफूटवर गेला. फाफ डु प्लेसिस आणि रजत पाटीदार यांना माघारी धाडलं. त्यानंतर विराट कोहली आणि कॅमरोन ग्रीन यांच्याही विकेट्स घेतल्या. पहिल्याच सामन्यात मुस्तफिझुर रहमानने 4 गडी बाद केले.
मुस्तफिझुरने 4 षटकात 29 धावा देत 4 गडी बाद केले. यावेळी त्याचा इकोनॉमी रेट हा 7.25 इतका होता. त्यानंतर आरसीबीच्या कॅमरून ग्रीनने 27 धावा देत 2 गडी बाद केले. तर दीपक चाहर, यश दयाल आणि कर्ण शर्माने प्रत्येक एक गडी बाद केला. पर्पल कॅपसाठी गोलंदाजांमध्ये येत्या काही सामन्यात रेस पाहायला मिळेल. पहिल्या सामन्यात बांगलादेशच्या मुस्तफिझुर रहमानने आपली छाप सोडली आहे.
| गोलंदाज | सामने | इकॉनोमी | विकेट्स |
|---|---|---|---|
| मुस्तफिझुर रहमान | 3 | 8.83 | 7 |
| मयंक यादव | 3 | 5.12 | 6 |
| युजवेंद्र चहल | 3 | 5.50 | 6 |
| मोहित शर्मा | 3 | 7.75 | 6 |
| खलील अहमद | 4 | 8.18 | 6 |
ड्वेन ब्राव्होने दोनदा (2013, 2015) पर्पल कॅप जिंकली आहे. भुवनेश्वर कुमार (2016, 2017) यानेही हा पुरस्कार दोनदा जिंकला आहे.
2008- सोहेल तनवीर, राजस्थान रॉयल्स, 22 विकेट्स
2009- आरपी सिंह, डेक्कन चार्जर्स, 23 विकेट्स
2010 – प्रज्ञान ओझा, डेक्कन चार्जर्स, 22 विकेट्स
2011- लसिथ मलिंगा, मुंबई इंडियन्स, 28 विकेट्स
2012- मोर्ने मॉर्केल, दिल्ली डेअरडेव्हिल्स, 25 विकेट्स
2013- ड्वेन ब्रावो, चेन्नई सुपर किंग्स, 32 विकेट्स
2014- मोहित शर्मा, चेन्नई सुपर किंग्स, 23 विकेट्स
2015- ड्वेन ब्रावो, चेन्नई सुप किंग्स, 26 विकेट्स
2016- भुवनेश्वर कुमार, सनरायझर्स हैदराबाद, 23 विकेट्स
2017- भुवनेश्वर कुमार, सनरायझर्स हैदराबाद, 26 विकेट्स
2018- अँड्र्यू टाय, किंग्स 11 पंजाब, 24 विकेट्स
2019- इम्रान ताहीर, चेन्नई सुपर किंग्स, 26 विकेट्स
2020- कगिसो रबाडा, दिल्ली कॅपिट्ल, 30 विकेट्स
2021- हर्षल पटेल, आरसीबी, 32 विकेट्स
2022- युजवेंद्र चहल, राजस्थान रॉयल्स, 27 विकेट्स
2023- मोहम्मद शमी, गुजरात टायटन्स, 28 विकेटच्स