इकडे संघाची घोषणा, तिकडे निवृत्ती, कुणी घेतला सन्यास? वाचा…

33 वर्षीय खेळाडूने भारतासाठी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नसला तरी 2014 मध्ये भारताने न्यूझीलंडचा दौरा केला तेव्हा तो आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर टीम इंडियाचा एक भाग होता. कुणी निवृत्ती घेतलीय वाचा...

इकडे संघाची घोषणा, तिकडे निवृत्ती, कुणी घेतला सन्यास? वाचा...
ईश्वरचंद पांडे
Image Credit source: social
| Updated on: Sep 12, 2022 | 10:20 PM

नवी दिल्ली :  एकीकडे टीम इंडियाची (Team India) घोषणा झाली तर दुसरीकडे एका वेगवान गोलंदाजानं निवृत्ती घेतली आहे. विशेष म्हणजे हा विगवान गोलंदाज धोनीच्या (MS Dhoni) टीममधील आहे. एकेकाळी भारतीय क्रिकेट संघाचा भाग असलेला वेगवान गोलंदाज ईश्वर पांडे याने आज आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. मध्य प्रदेशच्या या वेगवान गोलंदाजाने इन्स्टाग्रामवर निवृत्तीची माहिती दिली. 2022 च्या टी-20 (T-20) विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड झाल्यानंतर पांडेने निवृत्तीची घोषणा केली.

ईश्वरचंद पांडेची इन्स्टा पोस्ट

इंस्टाग्रामवर निवृत्तीची घोषणा करताना ईश्वरचंद पांडेनं लिहिलंय की, ‘आज तो दिवस आला आहे आणि जड अंतःकरणाने मी आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.2007 मध्ये मी हा अद्भुत प्रवास सुरू केला आणि तेव्हापासून मी मैदानावर आणि मैदानाबाहेर प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला. इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सामील होणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब होती.पण देशासाठी अधिक खेळण्याची संधी मिळू शकली नाही याचेही दु:ख आहे.

ईश्वर पांडे याच्याविषयी….

33 वर्षीय खेळाडूने भारतासाठी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नसला तरी 2014 मध्ये भारतीय संघाने न्यूझीलंडचा दौरा केला तेव्हा तो आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर टीम इंडियाचा एक भाग होता. ईश्वर त्या दौऱ्यावर एकदिवसीय आणि कसोटी संघाचा भाग होता. मात्र संपूर्ण दौऱ्यात त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातील तो पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू होता. ईश्‍वरने देशांतर्गत क्रिकेटमध्ये 75 प्रथम श्रेणी, 58 लिस्ट ए आणि 71 टी-20 सामने खेळले असून, त्याने अनुक्रमे 263, 63 आणि 68 विकेट घेतल्या आहेत.तो महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघाचा भाग आहे, ज्याने IPL चे विजेतेपद जिंकले आहे.मात्र, गेल्या तीन मोसमापासून तो आयपीएलमध्ये खेळत नाहीये.