न्यूझीलंड खेळाडूंच्या सुरक्षेसाठी तैनात, पाक पोलिसांकडून 8 दिवसात 27 लाखांची बिर्याणी फस्त

| Updated on: Sep 21, 2021 | 12:10 PM

सुरक्षेच्या कारणास्तव टॉसच्या अर्ध्यातासापूर्वी न्यूझीलंड क्रिकेट संघाने (New Zealand Cricket Team) पाकिस्तान दौऱ्यातून (Pakistan Tour) काढता पाय घेतला होता. याप्रकरणानंतर पाकिस्तानची क्रिकेटविश्वात नाचक्की झाली.

न्यूझीलंड खेळाडूंच्या सुरक्षेसाठी तैनात, पाक पोलिसांकडून 8 दिवसात 27 लाखांची बिर्याणी फस्त
Follow us on

इस्लामाबाद : सुरक्षेच्या कारणास्तव टॉसच्या अर्ध्यातासापूर्वी न्यूझीलंड क्रिकेट संघाने (New Zealand Cricket Team) पाकिस्तान दौऱ्यातून (Pakistan Tour) काढता पाय घेतला होता. याप्रकरणानंतर पाकिस्तानची क्रिकेटविश्वात नाचक्की झाली. पाकिस्तानने न्यूझीलंडवर धोका दिल्याचा आरोप केला आहे. मात्र आता पाकिस्तानचा नवा कारनामा समोर आला आहे. न्यूझीलंड खेळाडूंच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पाकिस्तानच्या पोलिसांनी 8 दिवसात तब्बल 27 लाख रुपयांची बिर्याणी खाली. पाकिस्तानातील 24NewHD TV या वेबसाईटने हा दावा केला आहे.

चॅनेलच्या दाव्यानुसार, न्यूझीलंड क्रिकेट संघ 8 दिवस पाकिस्तानात होता. इस्लामाबादच्या सेरेना हॉटेलमध्ये न्यूझीलंड संघाची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तिथे पाकिस्तानने मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती. इस्लामाबाद कॅपिटल टेरेटरी पोलीस इथे तैनात होते. यानुसार 500 पोलिसांची ड्युटी हॉटेलमध्ये होती. यामध्ये पाच एसपी आणि अनेक सहाय्यक अधिकाऱ्यांचा समावेश होता. या पोलिसांच्या जेवणाचा खर्च 27 लाख रुपये आला. सुरक्षेसाठी तैनात पोलिसांना दोनवेळा बिर्याणी दिली जात होती. त्यासाठी 8 दिवसांचं बिल 27 लाख रुपये इतकं आलं.

बिल नामंजूर

हे प्रकरण तेव्हा बाहेर आलं, जेव्हा 27 लाखांचं बिर्याणीचं बिल अर्थ विभागाकडे मंजुरीसाठी आलं. एवढी मोठी रक्कम कशी याचा तपास केल्यानंतर हे प्रकरण समोर आलं. त्यावर तातडीने हे बिल थांबवण्यात आलं. अजूनही हे बिल पास झालेलं नाही.

दुसरीकडे न्यूझीलंडच्या खेळाडूंच्या सुरक्षेसाठी विशेष जवानांची तुकडीही तैनात होती. त्यांचंही जेवणाचं वेगळं बिल आहे. त्या बिलाचा यामध्ये समावेश नाही.

न्यूझीलंडचा 18 वर्षांनी पाक दौरा

न्यूझीलंड क्रिकेट संघ 18 वर्षांनी पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. या संघात प्रमुख खेळाडू नव्हते. अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली होती. क्वारंटाईन आणि सराव सामन्यानंतर ज्या दिवशी सामना होता, त्या दिवशीच तो रद्द करण्यात आला. आम्हाला धमक्या आल्याने खेळू शकत नाही असं न्यूझीलंडने म्हटलं होतं.

असं असलं तरी पाकिस्तानने न्यूझीलंडच्या या निर्णयाचा जोरदार निषेध केला होता. सामना रद्द केला पण नेमकी कोणत्या प्रकारची धमकी होती ते तरी सांगा असं आर्जव पाकिस्तानने केलं होतं. दोन्ही संघात रावळपिंडी इथं सामना नियोजित होता, मात्र तो रद्द झाला.

संबंधित बातम्या  

पाकिस्तानची नाचक्की सुरुच! न्यूझीलंडनंतर इंग्लंडकडूनही दौरा रद्द

पाकिस्तानची नाचक्की! टॉसच्या अर्धा तास आधी न्यूझीलंडकडून सा्मना रद्द, पाकिस्तानविरोधात न खेळातच तातडीनं मायदेशी परतणार, नेमकं कारण काय?