India vs England 2021| मैदानावर अनधिकृतपणे प्रवेश, इंग्लंडच्या फलंदाजाला धक्का, जार्वो 69 शेवटी पोलिसांच्या ताब्यात

| Updated on: Sep 03, 2021 | 11:43 PM

स्वत: ला भारतीय क्रिकेट संघाचा चाहता म्हणवून घेणाऱ्या जार्वो 69 च्या कारनाम्यांना कंटाळून शेवटी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात होत असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीच्या खेळात तो पुन्हा भारतीय संघाची जर्सी घालून मैदानात आला होता.

India vs England 2021| मैदानावर अनधिकृतपणे प्रवेश, इंग्लंडच्या फलंदाजाला धक्का, जार्वो 69 शेवटी पोलिसांच्या ताब्यात
Jarvo 69
Follow us on

लंडन :  स्वत: ला भारतीय क्रिकेट संघाचा चाहता म्हणवून घेणाऱ्या जार्वो 69 च्या कारनाम्यांना कंटाळून शेवटी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात होत असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीच्या खेळात तो पुन्हा भारतीय संघाची जर्सी घालून मैदानात आला होता. त्याच्या का कृत्यामुळे शेवटी पोलिसांनी अटक केलं आहे. याआधी तो दोन वेळा सामन्यादरम्यान मैदानात घुसलेला आहे. (jarvo-69 arrested by police who entered in india and england 4th test match)

हरकती थांबत नसल्यामुळे जार्वो पोलिसांच्या ताब्यात 

जार्वो 69 चे खरे नाव डेनियल जार्वोस असे आहे. तो एक यूट्यूबर आहे. जार्वो स्वत:ला भारतीय संघाचा चाहता म्हणवून घेतो. त्याने यापूर्वी भरतीय संघाची जर्सी परिधान करुन दोन वेळा थेट मैदानात प्रवेश केला होता. आता पुन्हा एकदा चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशीच्या खेळात म्हणजेच आज तो पुन्हा एकदा मैदानावर दिसला. यावेळी त्याने हातात चेंडू घेऊन मैदानावर प्रवेश केला. त्याच्या या हरकती थांबत नसल्यामुळे त्याला अटक करण्यात आलं आहे. आज दिवसाच्या पहिल्या सत्रात जार्वोने मैदानात प्रवेश केला. इंग्लंडच्या डावातील 34 व्या षटकात त्याने मैदानात प्रवेश केला. त्यामुळे खेळ काही काळासाठी थांबवावा लागला. ‘जार्वो 69’ यापूर्वी लॉर्ड्स आणि लीड्स येथील कसोटी सामन्यातदेखील मैदानात उतरला होता.

अशा प्रकारे मैदानात घुसला

जार्वो यापूर्वी मैदानात दोन वेळा घुसल्यामुळे तो चांगलाच चर्चेत आला. आज पुन्हा त्याने मैदानात प्रवेश केला. यावेळी इंग्लंडचा संघ फलंदाजी करत होता. तर दुसरीकडे गोलंदाज म्हणून उमेद यादव उभा होता. तो या सत्रातील 34 वे षटक टाकण्यासाठी उभा होता. याच वेळात जार्वो हातात चेंडू घेऊन मैदानावर पळत आला. जार्वोला पाहून उमेश यादव बाजूला झाला. त्यानंतर पळत जाऊन जार्वोने चेंडू फलंदाजाकडे फेकला. यावेळी नॉन स्ट्राईकवर जॉनी बेयरस्टो थांबलेला होता. त्यालासुद्धा जार्वोने धक्का दिला. या सगळ्या धांदलीमध्ये उमेश यादवला आपले षटक पूर्ण करण्यास वेळ झाला.

इरफान पठाणने व्यक्त केली नाराजी

दरम्यान, जार्वोला पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरी आजी-माजी क्रिकेटपटू विविध प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. काही लोकांनी सध्याच्या कसोटी सामन्यांतील हा सर्वात आकर्षणाचा विषय असल्याचे म्हटलेय. तर इरफान पठाणसारख्या खेळाडूने हा गंभीर प्रकार असल्याचे म्हणत नाराजी व्यक्त केली आहे. सध्याच्या कोरोनाकाळात अशा घटना व्हायला नको आहेत, असं इरफानने म्हटलंय.

इतर बातम्या :

IND vs ENG 4th Test Day 2 Live : भारताच्या दुसऱ्या डावाला सुरुवात, सलामीवीर रोहित शर्मा – लोकेश राहुल जोडी मैदानात

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात 13 वं पदक, हरविंदर सिंगला तिरंदाजीत कांस्य

IND vs ENG : फलंदाजी सुधारण्यासाठी अजिंक्य रहाणेला मिळाला ‘हा’ महत्वाचा सल्ला

(jarvo-69 arrested by police who entered in india and england 4th test match)