AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : फलंदाजी सुधारण्यासाठी अजिंक्य रहाणेला मिळाला ‘हा’ महत्वाचा सल्ला

भारतीय क्रिकेट संघाचा माजी द्रुतगती गोलंदाज जहीर खानने अजिंक्य रहाणेला क्रिकेटपासून ब्रेक घेण्याचा सल्ला दिलाय. रहाणेने थोडा ब्रेक घेतला तर ते त्याच्यासाठी उपयुक्त ठरेल असं जहीन खानने म्हटलंय. भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे इंगलंड दौऱ्यावर खास कामगिरी करु शकला नाही.

IND vs ENG : फलंदाजी सुधारण्यासाठी अजिंक्य रहाणेला मिळाला 'हा' महत्वाचा सल्ला
अजिंक्य रहाणे
| Edited By: | Updated on: Sep 03, 2021 | 2:51 PM
Share

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा दमदार फलंदाज अजिंक्य रहाणे मागील काही दिवसांपासून खराब फॉर्ममध्ये आहे. अशावेळी फलंदाजी सुधारण्यासाठी अजिंक्यला नेट सरावापेक्षा आराम करण्याचा सल्ला देण्यात आलाय. महत्वाची बाब म्हणजे अजिंक्य रहाणेला हा सल्ला माजी क्रिकेटर जहीर खान याने दिलाय. भारतीय क्रिकेट संघाचा माजी द्रुतगती गोलंदाज जहीर खानने अजिंक्य रहाणेला क्रिकेटपासून ब्रेक घेण्याचा सल्ला दिलाय. रहाणेने थोडा ब्रेक घेतला तर ते त्याच्यासाठी उपयुक्त ठरेल असं जहीन खानने म्हटलंय. भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे इंगलंड दौऱ्यावर खास कामगिरी करु शकला नाही. त्यामुळे त्याच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. इंग्लंडविरोधात चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावातही रहाणेनं फक्त 14 धावा केल्या. त्यानंतर जहीर खानने त्याच्या फुटवर्कवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. (Zaheer Khan advises Ajinkya Rahane to take a break)

कोणत्याही खेळाडूला खेळवत राहण्यापेक्षा त्याला आराम देणं गरजेचं असतं, असं जहीर खान याने क्रिकबजला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलंय. रहाणेनं क्रिकेटपासून ब्रेक घेतला पाहिजे. अजिंक्य रहाणेवर सध्या मोठा दबाव आहे. अशावेळी कधीकधी ब्रेक घेणं गरजेचं असतं. ब्रेकमध्ये ते आपल्या फलंदाजीच्या तंत्रावर काम करु शकतात. पुढे जेव्हा वापसी करतील तेव्हा पूर्ण माईंडसेटने करु शकतील, असंही जहीर खानने म्हटलंय.

रहाणेच्या 6 डावात फक्त 109 धावा

अजिंक्य रहाणेने इंग्लंडविरोधात कसोटी सामन्यात एकूण 6 डावात एका अर्धशतकासह केवळ 109 धावा केल्या आहेत. यावेळी त्यांची सरासरी फक्त 18.36 राहिली आहे. इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीमध्ये पहिल्या डावात क्रेग ओवर्टनने रहाणेचा बळी मिळवला होता. रहाणे ओवर्टनचा बाहेर जाणारा चेंडू सोडून देण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी चेंडू रहाणेच्या बॅटला लागून थेट मोईन अलचीच्या हातात गेला. जहीर खान म्हणाला की, अजिंक्य रहाणे आपल्या फलंदाजीच्या तंत्राबाबत अडचणीचा सामना करत आहे. तसंच ओव्हलच्या कंडीशनमुळे भारतीय फलंदाजांसाठी मोठं आव्हान निर्माण झालं होतं. आता एका डावाचा खेळ बाकी आहे. संपूर्ण खेळ तंत्राचा आहे. आता या एका डावात ओव्हलमध्ये काय वेगळा खेळ दिसतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान, फलंदाजी सोपी नसेल, असंही जहीर खानने यावेळी म्हटलंय.

इतर बातम्या :

IND vs ENG : विराटला बाद केल्यानंतर जेम्स अँडरसनचा खुलासा, म्हणाला त्याला दाखवायचं होतं की…

IND vs ENG: मोईन अलीने घेतल्या 9 विकेट्स, भारतावर पराभवाची नामुष्की, इंग्लंडच्या ‘त्या’ विजयाची पुनरावृत्ती?

Zaheer Khan advises Ajinkya Rahane to take a break

फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.