IND vs ENG : विराटला बाद केल्यानंतर जेम्स अँडरसनचा खुलासा, म्हणाला त्याला दाखवायचं होतं की…

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या कसोटी सामन्यांत भारताचा कर्णधार विराट कोहली सतत जेम्स अँडरसनच्या बोलिंगवर बाद होत आहे. त्यामुळे त्याला एक मोठी धावसंख्या करता येत नाही.

IND vs ENG : विराटला बाद केल्यानंतर जेम्स अँडरसनचा खुलासा, म्हणाला त्याला दाखवायचं होतं की...
जेम्स अँडरसन
Follow us
| Updated on: Sep 02, 2021 | 1:51 PM

लंडन : भारतीय फलंदाजीचा कणा असणारा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) इंग्लंडच्या दौऱ्यात खास कामगिरी करत नसल्याने सर्वांच्याच चिंता वाढल्या आहेत. गेली दोन वर्ष शतकही न झळकावलेल्या विराटने इंग्लंड दौऱ्यातील तीन सामन्यात केवळ एक अर्धशतक ठोकत 124 धावा केल्या आहेत. विराटला स्वस्तात बाद करण्यात अव्वल क्रमाकांवर असणारा इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसनने (James Anderson) विराटची विकेट घेतल्यानंतर काय वाटते? याबाबत खुलासा केला आहे.

अँडरसनने ट्रेंट ब्रिज आणि लीड्स येथील कसोटी सामन्यात कोहलीची विकेट घेतली. यावेळी त्याने खूप आनंद साजरा केला होता. दरम्यान चौथ्या कसोटीपूर्वी त्याने द टेलीग्राफला दिलेल्या माहितीत कोहलीची विकेट घेण्याबाबत विशेष गोष्ट लिहिली आहे. त्याने लिहिलं आहे की, “लीड्स टेस्टच्या पहिल्या डावात जेव्हा मी विराटची विकेट घेतली मला फार भारी वाटलं अगदी पहिल्या कसोटीत त्याची विकेट घेतली होती तेव्हा वाटलं तसंच… याचं कारण तो एक उत्कृष्ट फलंदाज आहे. त्यामुळे त्याला बाद करण्याची भावना वेगळी आणि भारी असते. ती भावना त्याला दाखवण्यासाठी मी इतका जल्लोष करतो.”

विराटकडे दोन कसोटी सामने शिल्लक

विराट कोहलीचा हा तिसरा इंग्लंड दौरा आहे. याआधी 2014 मध्येही तो इंग्लंड दौऱ्यात अतिशय वाईटरित्या नापास झाला होता. तेव्हाही जेम्स अँडरसनने त्याला सतत बाद केले होते. मात्र 2018 च्या दौऱ्यात विराटने अप्रतिम पुनरागमन केलं.  दोन शतकं ठोकत तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. 2021 मध्येही विराट 2014 प्रमाणे अयशस्वी ठरत आहे. त्यामुळे मालिकेतील उर्वरीत दोन सामन्यात विराटने काही खास कामगिरी केल्यासच त्याचा दौरा यशस्वी जाऊ शकतो.

गावसकरांचा विराट कोहलीला सल्ला

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात केवळ 7 धावा करुन कोहली माघारी परतला.  जेम्स अँडरसननेच हा विकेट घेत कोहलीला सातव्यांदा बाद केलं. त्यावेळी लीड्स कसोटीत कॉमेंट्री करताना सुनील गावसकर यांनी विराट कोहलीला सल्ला दिला. “विराट कोहलीने तातडीने सचिन तेंडुलकरला फोन करुन, आपण काय करायला हवं हे विचारावं. कोहलीने तेच करावं जे सचिनने सिडनी कसोटीत केलं होतं. कोहलीने स्वत:ला सांगायला हवं, मी कव्हर ड्राईव्ह खेळणार नाही” असं गावसकर म्हणाले.

हेडिंग्ले कसोटीत विराट कोहली स्ट्रेट ड्राईव्ह मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला होता. गावसकर म्हणाले, ही माझ्यासाठी चिंतेची बाब आहे, कारण विराट पाचव्या, सहाव्या आणि सातव्या स्टम्पवर जाणाऱ्या चेंडूवर बाद होत आहे. 2014 मध्येही तो ऑफ स्टम्पवर आऊट होत होता”

हे ही वाचा :

IND vs ENG: मोईन अलीने घेतल्या 9 विकेट्स, भारतावर पराभवाची नामुष्की, इंग्लंडच्या ‘त्या’ विजयाची पुनरावृत्ती?

ICC Test Rankings: जो रूट फलंदाजीचा नवा बादशाह, जागतिक क्रमवारीत रोहितची ऐतिहासिक भरारी, विराट मात्र पिछाडीवर

IND vs ENG : चौथ्या कसोटी सामन्यात सूर्यकुमारला जागा नाही, माजी क्रिकेटपटूने सांगितले कारण

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.