विराट सातव्यांदा अँडरसनचा बळी, कोहलीला खेळताच येईना, गावसकर म्हणाले, आताच्या आता सचिनला कॉल कर!

महत्त्वाचं म्हणजे गेल्या दोन वर्षात विराट कोहली कसोटी क्रिकेटमध्ये एकही शतक ठोकू शकला नाही. विराट कोहलीने कसोटीतील शेवटचं शतक नोव्हेंबर 2019 मध्ये बांगलादेशविरुद्ध झळकावलं होतं. गेल्या 10 कसोटीत विराट कोहलीचा फॉर्म इतका घसरला आहे की त्याची सरासरी 25 च्या खाली गेली आहे.

विराट सातव्यांदा अँडरसनचा बळी, कोहलीला खेळताच येईना, गावसकर म्हणाले, आताच्या आता सचिनला कॉल कर!
विराट कोहली

मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) पुन्हा एकदा अपयशी ठरला. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात केवळ 7 धावा करुन कोहली माघारी परतला. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने (James Anderson) सातव्यांदा विकेट घेऊन, कोहलीला धक्का दिला. विराट कोहली सातत्याने अपयशी ठरत असल्याने टीम इंडियाची फलंदाजी कमकुवत दिसत आहे.

महत्त्वाचं म्हणजे गेल्या दोन वर्षात विराट कोहली कसोटी क्रिकेटमध्ये एकही शतक ठोकू शकला नाही. विराट कोहलीने कसोटीतील शेवटचं शतक नोव्हेंबर 2019 मध्ये बांगलादेशविरुद्ध झळकावलं होतं. गेल्या 10 कसोटीत विराट कोहलीचा फॉर्म इतका घसरला आहे की त्याची सरासरी 25 च्या खाली गेली आहे. विराट कोहलीच्या ढासळलेल्या फॉर्ममुळे चाहतेच नव्हे तर माजी दिग्गज क्रिकेटपटूही चिंतेत आहेत. माजी कसोटीपटू आणि माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी विराट कोहलीला सल्ला दिला आहे.

गावसकरांचा विराट कोहलीला सल्ला

लीड्स कसोटीत कॉमेंट्री करताना सुनील गावसकर यांनी विराट कोहलीला सल्ला दिला. “विराट कोहलीने तातडीने सचिन तेंडुलकरला फोन करुन, आपण काय करायला हवं हे विचारावं. कोहलीने तेच करावं जे सचिनने सिडनी कसोटीत केलं होतं. कोहलीने स्वत:ला सांगायला हवं, मी कव्हर ड्राईव्ह खेळणार नाही” असं गावसकर म्हणाले.

हेडिंग्ले कसोटीत विराट कोहली स्ट्रेट ड्राईव्ह मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला होता. गावसकर म्हणाले, ही माझ्यासाठी चिंतेची बाब आहे, कारण विराट पाचव्या, सहाव्या आणि सातव्या स्टम्पवर जाणाऱ्या चेंडूवर बाद होत आहे. 2014 मध्येही तो ऑफ स्टम्पवर आऊट होत होता”

सचिनला फोन लाव

सुनील गावसकरांनी विराट कोहलीला खराब फॉर्मबाबत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरशी बोलण्याचा सल्ला दिला. सचिनने एकही कव्हर ड्राईव्ह न मारता, 2003-04 मध्ये सिडनी कसोटीत 241 धावांची मॅरेथॉन इनिंग खेळली होती. सचिन 436 चेंडू खेळला होता, मात्र त्याने आपला आवडता एकही कव्हर ड्राईव्ह मारला नव्हता. विराट कोहलीही चांगले कव्हर ड्राईव्ह खेळतो, पण हाच कव्हर ड्राईव्ह त्याला इंग्लंडमध्ये अडचणीचा ठरत आहे. बाहेर जाणारे चेंडू खेळण्याच्या नादात विराट कोहली आऊट होत आहे. विराट कोहलीने इंग्लंड दौऱ्यात आतापर्यंत केवळ 69 धावा केल्या आहेत. त्याला एकही अर्धशतक झळकावता आलं नाही.

संबंधित बातम्या 

IND vs ENG : तिसऱ्या कसोटीत पुनरागमनासाठी ‘हे’ करावं लागेल, दिग्गज क्रिकेटपटूचा भारतीय संघाला सल्ला    

IND vs ENG : तिसऱ्या कसोटीत विराटचं अनोखं ‘अर्धशतक’, चाहत्यांसह स्वत: विराटही निराश

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI