ICC Test Rankings: जो रूट फलंदाजीचा नवा बादशाह, जागतिक क्रमवारीत रोहितची ऐतिहासिक भरारी, विराट मात्र पिछाडीवर

इंग्लंडचा कर्णधार जो रुट भारताविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेत अप्रतिम कामगिरी करत आहे. त्याच्या शतकांमुळे भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागत आहे. त्याच्या या शतकी खेळीचा फायदा त्याला आयसीसी कसोटी क्रमवारी ICC Test Ranking मध्ये झाला आहे.

ICC Test Rankings: जो रूट फलंदाजीचा नवा बादशाह, जागतिक क्रमवारीत रोहितची ऐतिहासिक भरारी, विराट मात्र पिछाडीवर
जो रुट

लंडन : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातील कसोटी मालिकेचा आयसीसी जागतिक कसोटी क्रिकेट क्रमवारीवर (ICC Test Cricket Ranking) मोठा परिणाम झाला आहे. इंग्लंडचा (England) कर्णधार जो रूटने (Joe Root) लीड्स टेस्टमध्ये (Leeds Test) टोकलेल्या शतकाने त्याला थेट जगातील नंबर एकचा कसोटी फलंदाज बनवलं आहे. आयसीसी कसोटी क्रिकेट क्रमवारीत (ICC Test Rankings) जो रूटने न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनला (Kane Williamson) मागे टाकलं आहे. तर दुसरीकडे भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) मात्र क्रमवारीत मागे पडला आहे. भारताचा सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्कष्ट क्रमाकांवर पोहचला आहे.

2021 या वर्षात जो रुटच्या बॅटमधून धावांचा अक्षरश: पाऊस पडत आहे. खासकरुन भारताविरुद्ध तो अगदी आग ओकत आहे. त्याने या वर्षातील 7 कसोटी सामन्यात एका दुहेरी शतकासह 4 शतकं ठोकली आहेत. 500 हून अधिक धावा करत रुट 916 गुण मिळवत पहिल्या स्थानावर पोहचला आहे. 2015 मध्ये तो पहिल्या क्रमांकावर होता. त्यानंतर आतापर्यंत त्याला पहिल्या क्रमांकावर येता येत नव्हता. अखेर केनला मागे टाकत रुट पुन्हा पहिल्या क्रमांकावर आला आहे.

कोहलीला मागे टाकत रोहित पुढे

दुसरीकडे भारताचा सलामीवीर रोहित शर्मा उत्तम प्रदर्शन करत आहे. तो 773 गुणांसह पहिल्यांदाच जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. त्याच्या कारकिर्दीतील हे सर्वोत्कृष्ट स्थान आहे. विशेष म्हणजे त्याने कर्णधार विराटला मागे टाकलं आहे. दुसऱ्या डावातील अर्धशतकानंतरही कोहली रँकिंगमध्ये खाली उतरला आहे. तो सहाव्या स्थानावर आला असून कोहलीसह ऋषभ पंतही टॉप 10 मधून बाहेर गेला आहे. तो 12 व्या स्थानावर पोहोचला आहे.

बुमराह टॉप-10 मध्ये परतला

गोलंदाजांच्या जागतिक क्रमवारीचा विचार करता ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज पॅट कमिन्स प्रथम स्थानावर आहे.तर दुसऱ्या स्थानावर भारताचा रवीचंद्रन आश्विन आहे. जेम्स अँडरसन अजूनही पाचव्या स्थानावर आहे. तर टॉप 10 मधून बाहेर गेलेला जसप्रीत बुमराह 758 गुणांसह 10 व्या क्रमांकावर आला आहे.  मोहम्मद शमी 18 वर असून इशांत शर्मा खाली उतरुन 19 व्या स्थानावर पोहोचला आहे.

हे ही वाचा

IND vs ENG: विराटच्या फलंदाजीबद्दल बालपणीच्या प्रशिक्षकाचं मोठ विधान, मोठी धावसंख्या होत नसल्याचं कारणही सांगितलं

भारतीय संघाकडून सलामीचा सामना, मग पाकिस्तान संघातून खेळला, भारताला पराभूत करण्यातही मोठा वाटा

CPL च्या सामन्यात पंचावर भडकला पोलार्ड, राग व्यक्त करण्यासाठी मैदानात केले असे काही, पाहा VIDEO

(ICC mens test ranking revealed joe root on number 1 position and rohit sharma on 5th virat drop in list)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI