AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG: विराटच्या फलंदाजीबद्दल बालपणीच्या प्रशिक्षकाचं मोठ विधान, मोठी धावसंख्या होत नसल्याचं कारणही सांगितलं

भारत आणि इंग्लंड मालिकेत सर्वांचच लक्ष कर्णधार विराट कोहलीकडे लागलं आहे. मागील 2 वर्षांपासून सर्व भारत विराटच्या शतकाची वाट पाहत आहे. इंग्लंडच्या मालिकेतील उर्वरीत सामन्यात तरी विराट एक मोठी धावसंख्या करेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

IND vs ENG: विराटच्या फलंदाजीबद्दल बालपणीच्या प्रशिक्षकाचं मोठ विधान, मोठी धावसंख्या होत नसल्याचं कारणही सांगितलं
विराट कोहली
| Edited By: | Updated on: Sep 01, 2021 | 3:02 PM
Share

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याच्यासाठी  इंग्लंडचा दौरा (England Tour) आतापर्यंत अधिक खास ठरलेला नाही. आतापर्यंत 3 सामन्यांतील 5 डावांत त्याने केवळ एक अर्धशतक बनवलं आहे. तर मागील 2 वर्षात एकही शतक ठोकलेलं नाही. त्यामुळे भारतीय चाहते त्याच्या शतकाची वाट पाहत आहेत. अनेकजण विराटच्या फलंदाजीवर बोट उचलत असून प्रश्न उपस्थित करत आहेत. अशावेळी विराटने बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा (Rajkumar Sharma) यांनी विराट इंग्लंड दौऱ्यात चांगली फलंदाजी करुनही मोठी धावसंख्या करु शकत नसल्याचे कारण सांगितले आहे.

विराट कोहलीने इंग्लंडच्या मालिकेत 3 सामन्यात केवळ 124 धावा केल्या आहेत. तो धावा करण्यात भारतीय फलंदाजामध्ये चौथ्या नंबरवर आहे. लीड्स टेस्टमध्ये त्याने दुसऱ्या डावात संयमी फलंदाजी करत अर्धशतक ठोकलं. पण काही वेळातच तो बाद झाला. बहुतेक वेळीप्रमाणे ऑफसाईडचा बॉल मारताना तो स्लिपमध्ये झेल देऊन बसला. त्यानंतर त्याच्या फलंदाजीवर अनेक प्रश्न उठू लागले आहेत. अशावेळी प्रशिक्षक शर्मा म्हणाले,” “माझ्या मते मालिकेच्या सुरुवातीपासून विराट चांगली फलंदाजी करत आहे. पण इंग्लंडचे गोलंदाज अधिक चांगली गोलंदाजी करत असल्याने त्यांच्यासमोर चांगले चांगले फलंदाज बाद होत आहेत. त्यामुळे विराटला एक मोठी धावसंख्या करता येत नाही.”

विराटकडे दोन कसोटी सामने शिल्लक

विराट कोहलीचा हा तिसरा इंग्लंड दौरा आहे. याआधी 2014 मध्येही तो इंग्लंड दौऱ्यात अतिशय वाईटरित्या नापास झाला होता. तेव्हाही जेम्स अँडरसनने त्याला सतत बाद केले होते. मात्र 2018 च्या दौऱ्यात विराटने अप्रतिम पुनरागमन केलं.  दोन शतकं ठोकत तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. 2021 मध्येही विराट 2014 प्रमाणे अयशस्वी ठरत आहे. त्यामुळे मालिकेतील उर्वरीत दोन सामन्यात विराटने काही खास कामगिरी केल्यासच त्याचा दौरा यशस्वी जाऊ शकतो.

हे ही वाचा

भारतीय संघाकडून सलामीचा सामना, मग पाकिस्तान संघातून खेळला, भारताला पराभूत करण्यातही मोठा वाटा

CPL च्या सामन्यात पंचावर भडकला पोलार्ड, राग व्यक्त करण्यासाठी मैदानात केले असे काही, पाहा VIDEO

IPL 2021: राजस्थान रॉयल्स संघाला आणखी एक झटका, बटलर, स्टोक्स, आर्चरनंतर आणखी एक इंग्लंडवासी दुखापतग्रस्त

(Indian captain Virat kohlis coach rajkumar sharma say england bowling is so good thats why none of indians including virat scoring big score)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.