
IPL 2024 SRH vs MI : IPL 2024 च्या 8 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने आज नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई इंडियन्स संघाने या सामन्यात मोठे बदल केले आहेत. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने 17 वर्षीय खेळाडूचा प्लेइंग 11 मध्ये समावेश केला आहे. या खेळाडूला नुकतीच बदली म्हणून जागा मिळाली आणि आता त्याला पदार्पणाची संधी मिळाली आहे.
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज क्वेना माफाका याला आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. दुखापतग्रस्त श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दिलशान मदुशंकाच्या जागी सत्र सुरू होण्यापूर्वी १७ वर्षीय क्वेना माफाकाचा संघात समावेश करण्यात आला होता. माफाका संघातील सर्वात तरुण खेळाडूंपैकी एक आहे. आतापर्यंत तो फक्त अंडर-19 क्रिकेटमध्ये खेळला आहे.
दक्षिण आफ्रिकेचा 17 वर्षीय क्वेना माफाका अंडर 19 विश्वचषकादरम्यान प्रकाशझोतात आला होता, जिथे त्याने 21 विकेट घेतल्या होत्या आणि 19 वर्षाखालील विश्वचषकात त्याला टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू म्हणूनही गौरविण्यात आले होते. डाव्या हाताच्या गोलंदाजाने 21 विकेट्स हे U19 विश्वचषकाच्या एकाच मोसमात वेगवान गोलंदाजाने घेतलेले सर्वाधिक बळी आहेत. त्याने वयाच्या 15 व्या वर्षी दक्षिण आफ्रिका U19 संघासाठी पदार्पण केले आणि यापूर्वी दोन U19 विश्वचषक खेळले आहेत. तो ताशी 140 किमीच्या वेगाने बॉलिंग करण्यास सक्षम आहे.
मुंबई इंडियन्सने आतापर्यंत अनेक नव्या खेळाडूंना संधी दिली आहे. त्यामुळे अनेक खेळाडूंची कामगिरी जगासमोर आली आहे. मुंबई इंडियन्सने या सीजनमध्ये रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला कर्णधार करण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार असला तरी त्याच्या ऐवजी पांड्याला कर्णधार केल्याने त्याच्यावरही अधिक प्रेशर असणार आहे.
इशान किशन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा, नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी, शम्स मुलानी, पियुष चावला, जसप्रीत बुमराह, क्वेना माफाका.
ट्रॅव्हिस हेड, मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (डब्ल्यू), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (सी), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, जयदेव उनाडकट